Shilpa Raj 5 
मनोरंजन

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीची पहिली पोस्ट

'भूतकाळातील आव्हानांमधून मी पुढे आले आणि आता भविष्यात..'

स्वाती वेमूल

अश्लील चित्रफीत प्रकरणात व्यावसायिक आणि पती राज कुंद्राच्या Raj Kundra अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने Shilpa Shetty सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे. शिल्पाने एका पुस्तकातील पान इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केलं आहे. भूतकाळ आणि भविष्यकाळ यांमध्ये न अडकता वर्तमान कसा शांतपणे जगावा, याबद्दल पुस्तकातील त्या पानावर लिहिलं आहे. राज कुंद्राला सोमवारी गुन्हे शाखेने अटक केली असून २३ जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. (Shilpa Shetty Shares First Post After Husband Raj Kundras Arrest slv92)

काय आहे शिल्पा शेट्टीची पोस्ट?

'क्रोधाने मागे वळून पाहू नका किंवा भीतीने भविष्यकाळाला सामोरं जाऊ नका पण आपल्या आजूबाजूला आता जे घडतंय, त्याकडे जागरूकतेने पहा', या जेम्स थर्बरच्या काही ओळी या पोस्टच्या सुरुवातीला आहेत. घडून गेलेल्या आणि भविष्यात घडणाऱ्या गोष्टींपेक्षा वर्तमानात जे घडतंय त्यावर विचलित न होता लक्ष केंद्रीत करणं, अशा आशयाची ही पोस्ट आहे. 'ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिलाय, ज्यांच्यामुळे आपण दुखावलो गेलोय, त्याकडे आपण रागाने बघतो. तर भविष्यात आपली नोकरी जाईल का, आपल्याला आजार होतील का, आपली जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाईल का ही भीती सतत आपल्याला सतावत असते. मात्र आपल्याला फक्त वर्तमानात जगायचं आहे. मी जिवंत आहे यातच माझं नशिब समजून मी दीर्घ श्वास घेते. भूतकाळातील आव्हानांमधून मी पुढे आले आणि आता भविष्यात येणाऱ्या आव्हानांनाही मी सामोरं जाईन. पण आज आणि आता काय घडतंय त्यावर माझं पूर्ण लक्ष केंद्रीत करण्यापासून कोणतीच गोष्ट रोखू शकत नाही', असं त्यात पुढे लिहिलंय.

अश्लील चित्रफित निर्मितीप्रकरणात शिल्पा शेट्टीची अद्याप कोणतीही सक्रिय भूमिका आढळली नसून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 'पीडितांनी पुढे येऊन क्राइम ब्रांच मुंबईशी संपर्क साधावा. आम्ही योग्य ती कारवाई करू', असं मुंबईचे सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : पंजाब सरकारी कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानी मोर्चा

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

Mumbai News: मुंबईतील २५० अनधिकृत बांधकामांवर हातोडा, महापालिकेची धडक मोहीम

SCROLL FOR NEXT