actress shilpa shetty husband raj kundra  
मनोरंजन

राज कुंद्राची तुरूंगातील एक रात्र ते गेहना वशिष्ठचा सहभाग, जाणून घ्या सारं काही

पोलिसांच्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटलय?

दीनानाथ परब

मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) अटकेमुळे चर्चेत आला आहे. काल रात्री त्याला पॉर्न फिल्म रॅकेट (porn film racket) प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai police) अटक केली. राज कुंद्रा हाच या प्रकरणातील प्रमुख सुत्रधार असल्याचा आरोप आहे. (Shilpa Shettys husband Raj Kundra arrested Heres all you need to know about the controversial case dmp82)

पोलिसांच्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटलय?

मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी राज कुंद्राच्या अटकेच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले. "पॉर्नोग्राफीक चित्रपट बनवून काही अ‍ॅप्सवर प्रदर्शित केले जात असल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे फेब्रुवारी २०२१ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. आम्ही राज कुंद्राला १९-७-२०२१ रोजी अटक केली. तोच या प्रकरणात मुख्य कारस्थानकर्ता आहे" असे मुंबई पोलिसांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.

राज कुंद्राविरोधात फसवणूक कलम (४२०), (३४) (२९२), (२९३) अश्लील, असभ्य जाहीरात या आयपीसीच्या कलमातंर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

रात्री कुठे ठेवलं?

अटक केल्यानंतर राज कुंद्राला लगेच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या संपत्ती विभागातील पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे.रुग्णालयात नेले. वैद्यकीय तपासणीनंतर राज कुंद्राला मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात नेण्यात आले. तिथे त्याला गुन्हे शाखेच्या कोठडीत ठेवण्यात आले. आज दुपारी १.३० वाजता राज कुंद्राला किला कोर्टात हजर करण्यात येईल.

गेहना वशिष्ठची काय भूमिका ?

राज कुंद्राला ज्या पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आलीय, त्याचा तपास या वर्षाच्या सुरुवातीपासून सुरु आहे. यामध्ये मॉडेल, अभिनेत्री गेहना वशिष्ठसह नऊ जणांना अटक करण्यात आलीय. या प्रकरणात युकेमधील प्रोडक्शन कंपनी केनरीनचा सहभाग समोर आल्यानंतर राज कुंद्राचे नाव समोर आले.

पोलिसांनी अधिकारी उमेश कामतला अटक केली. तो आधी राज कुंद्राकडे काम करायचा. गेहना वशिष्ठने शूट केलेले आठ अश्लील पॉर्नोग्राफीक व्हिडिओ सोशल मीडिया अ‍ॅपवर अपलोड केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. केनरीनमध्ये राज कुंद्रा भागीदार असल्याचा पोलिसांना संशय आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Banana Market: केळीच्या दरात घसरण; २६ रुपये किलोचा दर ३ रुपयांवर, निर्यातदारांची बागांकडे पाठ; साेलापुरातील उत्पादकांचे हाल

उमेश कामत पहिल्यांदाच दिसणार डॉक्टरच्या भूमिकेत ! ताठ कणा सिनेमाचा ट्रेलर रिलीज

Latest Marathi Breaking News Live: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगली व कोल्हापूर ऊस दरावरून कार्यकर्त्यांची धरपकड

Solapur Crime: 'साेलापुरात फोटो व्हायरलची धमकी देऊन विनयभंग'; पाच संशयित आरोपींविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Buldhana Accident: जामसावळीला जाणाऱ्या दोन भाविकांचा अपघाती मृत्यू; केळवदनजीक ट्रकने दिली दुचाकीला धडक

SCROLL FOR NEXT