Raj kundra : मोबाईल अॅपसाठी अश्लील चित्रफीत म्हणजे पोर्नोग्राफिक फिल्म्स तयार करणे आणि ती अपलोड करणे या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षी २०२१ मध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa shetty) हिचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्रा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी राजला पोलिस कोठडीही सुनावण्यात आली होती. सध्या तो जामिनावर आहे. आता राजने पुन्हा न्यायालयात धाव घेतली आहे. 'माझा काहीही दोष नसून मला या प्रकरणातून मुक्त करा' असं अर्ज राज कुंद्राने न्यायालयात दाखल केला आहे. (Shilpa Shetty's Husband Raj Kundra Calls For Relief In Porn App Case)
राज कुंद्रा याला जुलै २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. सप्टेंबर २०२१ मध्ये महानगर दंडाधिकारी न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. अश्लील चित्रपट आपण केले नाहीत किंवा त्यांची विक्रीही केली नाही. आर्मस्प्राईम मीडिया प्रायव्हेट लिमिटेड (एएमपीएल) मध्ये गुंतवणूक केली होती. मात्र, या कंपनीचाही अश्लील चित्रपटांशी काहीही संबंध नाही, असे कुंद्रा याने सदर याचिकेत म्हटले आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रात राज कुंद्राने, माझ्याविरोधात काहीही पुरावे नाहीत किंवा पुरवणी आरोपपत्रात मी व माझ्या कंपनीचा आयटी प्रमुख रायन थॉर्प यांनी पीडितांना जबरदस्ती केली आहे , धमक्या दिल्या आहेत, असेही नमूद करण्यात आले नाही. किंवा कोणत्याही कलाकारांनी (एएमपीएलचे क्लायंट) तथाकथित चित्रीकरण आणि कामुक सामग्रीच्या प्रसारणाबाबत कधीही कोणतीही तक्रार केली नाही किंवा कोणताही इशारा दिला नाही, असे याचिकेत म्हटले आहे.
त्यामुळे सध्या आपली निर्दोश मुक्तता व्हावी यासाठी राज कुंद्राचे प्रयत्न सुरु आहेत. 'माझ्यावरील गुन्हा सिद्ध करण्यासाठी माझ्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत. किंवा प्राप्त पुराव्यातून या गुन्ह्यात माझा समावेश असल्याचे सिद्ध होत नाही. त्यामुळे माझी मुक्तता करावी,' अशी मागणी राजने न्यायालयात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.