Madhuri Dixit And Shilpa Shinde esakal
मनोरंजन

Jhalak Dikhhla Jaa मध्ये शिल्पा शिंदेबरोबर माधुरीने केला डान्स, पाहा व्हिडिओ

शिल्पा शिंदेबरोबर माधुरी दीक्षितने केला डान्स

सकाळ डिजिटल टीम

Jhalak Dikhala Jaa : कलर्स टीव्हीवर झलक दिखला जा सीझन १० चा नवीन प्रोमो व्हिडिओ रिलीज झाला आहे. या व्हिडिओमध्ये भाभी जी फेम शिल्पा शिंदे माधुरी दीक्षितसोबत डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये शिल्पा म्हणतेय, तिने सलमानसाठी बिग बॉस शो केला आणि आता ती माधुरी दीक्षितसाठी (Madhuri Dixit) 'झलक दिखला जा'मध्ये आली आहे.

सलमानसाठी बिग बॉस, माधुरीसाठी झलक...

झलक दिखला जा 3 सप्टेंबर रोजी कलर्स टीव्हीवर प्रसारित होणार आहे. चॅनलने या रिअॅलिटी डान्स शोचा नवीन प्रोमो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या प्रोमोनुसार शिल्पा शिंदे या रिअॅलिटी शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये घागरा गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षितही शिल्पासोबत डान्स करताना दिसत आहे.

यावेळी माधुरी दीक्षित या शोच्या परीक्षक मंडळामध्ये डान्सर्संना जज करताना दिसणार आहे. व्हिडिओत जेव्हा माधुरीने शिल्पा शिंदेला विचारले की इतके दिवस तू कुठे होतीस? तर शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) म्हणते की तिने सलमानसाठी बिग बॉस शो केला होता आणि तिच्यासाठी झलकची वाट पाहात होती. (TV Entertainment News)

झलकच्या मंचावर शिल्पाची दमदार एन्ट्री

दीर्घ विश्रांतीनंतर शिल्पा शिंदे टीव्हीवरील 'झलक दिखला जा' या शोमधून पुनरागमन करत आहे. शोच्या प्रोमो व्हिडिओमध्ये शिल्पाची एंट्री देखील खास आहे. ती माधुरीच्या एक दो-तीन गाण्याच्या स्टाईलमध्ये शिल्पा माधुरीच्या प्रश्नाला उत्तर देताना दिसत आहे.

माधुरीने विचारले, 'शिल्पा जी, इतने दिन कहाँ थी आप?' त्यावर शिल्पा म्हणते, आम्ही झलकचा प्रतिक्षा करत होतो. या व्हिडिओनंतर शोबद्दल युजर्सची उत्सुकता आणखी वाढली आहे. शोमधून शिल्पाच्या पुनरागमनाबद्दल चाहते उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! वर्षा गायकवाडांकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी; 'या' तीन नामवंतांनाही मिळाली संधी

खलनायक ते राजकारणी: ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचा प्रवास थांबला; 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

IND vs FRA: युरोप दौऱ्यावर असलेल्या भारताचा हॉकीत सलग तिसरा विजय; फ्रान्सलाही दिली मात

Kolhapur : ए. एस. ट्रेडर्सच्या माध्यमातून कोल्हापूर व बेळगावातील गोरगरिबांना लुटायचा, पोलिसांनी ट्रॅप लावून मुख्य एजंटला केली अटक

Maharashtra Bar Strike : मद्यपींसाठी महत्त्वाची बातमी! राज्यभरातील बार उद्या राहणार बंद; HRAWI चा जाहीर पाठिंबा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT