swapnil joshi and shilpa tulaskar  sakal
मनोरंजन

सध्या प्रेयसीच्या भूमिकेत असणारी शिल्पा तुळसकर तेव्हा स्वप्नील जोशीची आई झाली होती..

'तू तेव्हा तशी' या मालिकेत असणाऱ्या शिल्पा तुळसकर आणि स्वप्नील जोशी या जोडगोळीने एकेकाळी आई मुलाची भूमिका साकारली होती. ती मालिका होती..

नीलेश अडसूळ

मालिका विश्वात कधी कोणाच्या वाट्याला कोणती भूमिका येईल हे सांगता येत नाही.आज आई मुलाची भूमिका साकारणारे उद्या सासू जावई असतील किंवा दोन सख्खे मित्र पक्के वैरी असतील. आपल्याला दिलेली भूमिका चोख बजावणं एवढंच कलाकाराच्या हाती असतं. पण आज प्रियकर आणि प्रेयसीची भूमिका साकारणारे अभिनेता स्वप्नील जोशी (swapnil joshi) आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकर (shilpa tulaskar) यांनी एकेकाळी आई मुलाची भूमिका साकारली होती. यावर खरं तर अनेकांचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे..

तू तेव्हा तशी हि मालिका म्हणजे एक प्रेम कहाणी आहे.'ती'च्या साठी थांबलेला तो, आणि पहिला लग्न मोडल्यानंतर नव्याने तत्याच्या प्रेमात पडणारी 'ती'... अशी वयाच्या चाळीशी गाठत आलेल्या मित्र मैत्रिणींची प्रेमकथा आहे. ही जोडी या निमित्ताने एकत्र आली असली तरी या आधीही त्यांनी एकत्र काम केले आहे. तुम्हला आश्चर्य वाटेल पण फार वर्षांपूर्वी या दोघांनी एकत्र काम केले होते, ते आई मुलाच्या भूमिकेत.

'हद कर दी' या १९९९ मध्ये आलेल्या हिंदी विनोदी मालिकेत स्वप्नील आणि शिल्पा एकत्र दिसले होते. या मालिकेत स्वप्नीलने शिल्पाच्या मुलाची भूमिका साकारली होती. या मालिकेतील एक फोटो सध्या व्हायरल झाला असून त्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या मालिकेला सध्या चाहत्यांचे विशेष प्रेम मिळत आहे. शिल्पा आणि स्वप्नीलची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता त्यांच्या नात्यात काय नवीन घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: अर्शदीप सिंग ५ व्या T20I मधून बाहेर होणार? हैदराबादमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये असं नेमकं काय घडलं; सविस्तर जाणून घ्या

Mohol Crime : मोहोळ येथे चार लाख चौसष्ट हजाराची सुगंधी तंबाखु जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Shirur Crime : अपहार केल्याप्रकरणी टपाल खात्याच्या डाकपालाविरूद्ध गुन्हा दाखल; डाकपाल फरार

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 ऑक्टोबर 2026

IND vs WI 4th T20I : वेस्ट इंडिजने हैदराबादचं मैदान मारलं, भारताला पराभूत करत मालिकेत बरोबरी; सॅमसनची फिफ्टी व्यर्थ

SCROLL FOR NEXT