Shilpa Tulaskar Hasratein Series, trailer released  Instagram
मनोरंजन

Shilpa Tulaskar: इंटिमेट सीन्सनी खचाखच भरलीय शिल्पाची नवी सीरिज; ट्रेलर जरा जपूनच पहा...

शिल्पानं ६ डिसेंबर रोजी तिच्या आगामी 'हसरतें' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित केला अन् ट्रोलर्सनी अभिनेत्रीवर निशाणा साधला.

प्रणाली मोरे

Shilpa Tulaskar: शिल्पा तुळसकर हे नाव केवळ मराठी मालिका-सिनेमांपुरतं मर्यादित नसून एकेकाळी हिंदीत अधिक गाजलेलं हे नाव. शिल्पानं अनेक गाजलेल्या हिंदी मालिकांमधनं उल्लेखनीय व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. मराठीतही तिनं मोजक्याच व्यक्तिरेखा साकारल्या पण त्या लोकांच्या डोक्यात आजही फिट बसल्या आहेत.

सध्या शिल्पा झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी..' मालिकेत चाळीशीनंतरच्या लव्ह स्टोरीमधनं आपल्या भेटीस आली आहे. सोशल मीडियावर शिल्पा म्हणावी तशी सक्रिय नसली तरी अनेकदा ती आपल्याविषयीच्या महत्त्वाच्या अपडेट्स देताना दिसते कधी फोटो शेअर करतानाही दिसते.

आता शिल्पानं तिच्या इन्स्टा अकाउंटवर तिच्या नव्या सीरिजचा जो व्हिडीओ शेअर केलाय त्यानं मात्र खळबळ उडाली आहे.

शिल्पानं ६ डिसेंबर रोजी तिच्या आगामी 'हसरतें' सीरिजचा ट्रेलर शेअर केला आहे. मात्र तिच्या नव्या पोस्टनंतर सर्वांनाच शॉक बसला आहे. कारण या सीरिजचा संपूर्ण ट्रेलर इंटिमेट सीन्सनी खचाखच भरलेला आहे. 'हसरतें' ही सीरिज मनातील भावनांच्या संघर्षावर आधारित आहे. ५ वेगवेगळ्या कथा यात दाखवल्या आहेत. यातील एका कथेत शिल्पा आहे. अर्थात ट्रेलर शेअर करत शिल्पानं त्या सीरिजला समर्पक असं कॅप्शन देत,छोटीशी माहितीपू्र्ण नोटही लिहिली आहे. हसरतें ही सीरिज हंगामा वर १२ डिसेंबरला रीलिज होणार आहे.

शिल्पानं 'हसरतें' सीरिजचा ट्रेलर शेअर करत लिहिलं आहे,''हसरतें तो हर दिल में होती है, पर ज़माने की बंदिशों के सामने उन्हें पूरा करना गलत सा लगता है। पर ये ख्वाहिशें यूं ही नहीं होती, कुछ तो कहानी होती है हर हसरत के पीछे। देखिए हसरतों की इसी संघर्ष पे आधारित 5 दिलचस्प कहानियां।'' आता शिल्पाच्या चाहत्यांना उत्सुकता असणारच या सीरिजमध्ये नेमकं शिल्पाचं पात्र किती बोल्ड दाखवण्यात आलंय हे जाणून घेण्यासाठी.

शिल्पाच्या 'हसरतें' सीरिजचा ट्रेलर पाहून चाहते मात्र तिच्यावर भलतेच भडकलेयत. काहींनी तर चक्क 'शी....' म्हणत संताप व्यक्त केलाय. तर काहींनी या अशा भूमिका तू करू नकोस असा सल्ला अभिनेत्रीला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani house firing : पाचवा आरोपी एन्काउंटरमध्ये जखमी; पोलिसांना गयावया करत म्हणू लागला...

EPFO Update: 'पीएफ'ची सगळी माहिती एका क्लिकवर; काय आहे Passbook Lite?

Kannad News : शहीदांच्या ८५ वर्षीय आई-वडिलांना दोन तासांत न्याय; तहसीलदारांची संवेदनशील भूमिका

Most Dangerous Room in the House: स्वयंपाकघर किंवा गॅरेज नाही, तर हृदयरोगतज्ज्ञांच्या मते घरातील ही खोली आहे आरोग्याच्या दृष्टिने अधिक धोकादायक

Latest Marathi News Updates : सोलापूर-मुंबई, सोलापूर-बंगळूरू विमानसेवा 15 ऑक्टोबरपासून सुरु

SCROLL FOR NEXT