Shiney Ahuja Birthday rape case one mistake destroy his career sakal
मनोरंजन

Shiney Ahuja Birthday: 'ती' एक चुक.. अन् शायनीचं अख्ख करियर बरबाद झालं..

टॅलेंट असूनही एका चुकीने 'शायनी'चं आयुष्य उद्ध्वस्त झालं, आज त्याचा वाढदिवस..

नीलेश अडसूळ

Shiney Ahuja Birthday: अभिनेता शायनी आहुजा ह्याचा आज वाढदिवस. एकेकाळी बॉलीवूडमध्ये अत्यंत वेगाने प्रसिद्धीस आलेला आणि स्वतःच्या अभिनयाची वेगळी किमया दाखवणाऱ्या या अभिनेत्याचा आज कित्येक जणांना विसरही पडला असेल.

पण मनोरंजन विश्वातून हद्दपार झालेला हा अभिनेता टॅलेंट ने अक्षरशः भरलेला होता. कदाचित तो मोठा सुपरस्टार ही झाला असता. तो जेव्हा मनोरंजन विश्वात आला तेव्हा त्यांचे काम पाहून अनेकांनी तशी पावतीही त्याला दिली होती.

पण त्याच्या हातून एक चूक घडली आणि त्याला इतकी भोवली की त्याचं अख्ख आयुष्य पणाला लागलं. नेमकं काय होतं हे प्रकरण जाऊन घेऊया..

(Shiney Ahuja Birthday rape case one mistake destroy his career)

शायनीचा जन्म 15 मे 1975 रोजी डेहराडूनमध्ये झाला. एक काळ असा होता की, हा अभिनेता बॉलिवूडचा चेहरा बनेल कि काय असे वाटत होते. त्याच्यावर चाहत्यांचे असलेले प्रेम पाहून अनेक बड्या कलाकारांनाही आश्चर्य वाटे.

शायनीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. 'हजारों ख्वाहिशे ऐसी' या पहिल्याच चित्रपटातून शायनीने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी शायनीचे विशेष कौतुक झाले.


चित्रपट क्षेत्रातील त्याची वाटचाल वेगात सुरु असतानाच त्याच्याबद्दल एक अशी बातमी (bollywood news) आली, ज्याने संपूर्ण मनोरंजन विश्व हादरवून सोडले. घरातील मोलकरणीवर त्याने बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर झाला आणि त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती.

हाच त्याच्या आयुष्यातील काळा दिवस ठरला. ही बातमी वेगात पसरली आणि शायनीची मोठी बदनामी झाली. त्याच्या बहरत असलेल्या कारकीर्दला गालबोट लागले. ही चूक अशी होती की मनोरंजन विश्वानेही त्याच्यासाठी दारं बंद केली.

बलात्काराच्या आरोपानंतर शायनी जवळपास दोन वर्षे इंडस्ट्रीतून गायब होता. चाहतेही त्याला विसरून गेले. 2012 मध्ये शायनीने 'भूत' चित्रपटातून पुनरागमन केले, मात्र या चित्रपटाला विशेष प्रतिसाद मिळाला नाही.

त्यानंतर तब्बल पुन्हा दोन वर्षे शायनीने काहीच केले नाही. 2015 मध्ये ‘वेलकम बॅक’ या चित्रपटात तो दिसला, पण त्यानंतर त्याने या क्षेत्राकडे पाठ फिरवली. बलात्काराचा आरोप झाल्यानंतर शायनीला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याला जामीनही मिळाला पण शायनी मात्र बॉलिवूडमध्ये पुन्हा आपले स्थान निर्माण करू शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुग्णवाहिकेलाही डिझेल नाही! मृतदेह घेऊन जाणारी गाडी मध्यरात्री पंपावर ठप्प, शासनाच्या नियमालाही हरताळ

पुण्यात टोळीयुद्ध थांबेना! वनराजच्या हत्येनंतर २० महिन्यात आंदेकर टोळीनं तिघांना संपवलं, अजून किती बळी जाणार?

Mumbai Goa Highway: काम अर्धवट पण वसुलीत मात्र हायटेक! निकृष्ट व अपूर्ण काम, तरीही मुंबई-गाेवा महामार्गावरील खारपाडा टोल नाका सुरू, रायगडकरांचा उद्रेक

Latest Marathi News Live Update : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन

NEET Paper Leak Exposed: NEET पेपरफुटीचा भांडाफोड करणारे, व्हायरल PDF दाखवणारे शशिकांत सुथार कोण?

SCROLL FOR NEXT