shiv thakare, raj thackeray, bigg boss 16 SAKAL
मनोरंजन

Bigg Boss 16 नंतर Shiv Thakare ची मनसेत एंट्री? राज ठाकरेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण

बिग बॉस १६ चा रनर अप शिव ठाकरे नुकताच राज ठाकरेंना भेटलाय

Devendra Jadhav

Shiv Thakare News: बिग बॉस १६ चा रनर अप शिव ठाकरे नुकताच राज ठाकरेंना भेटलाय. शिवचा राज ठाकरें (Raj Thackeray) च्या घराबाहेरचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.

शिव आणि राज ठाकरेंच्या भेटीमुळे शिव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार का अशी चर्चा आहे. शिव आणि राज ठाकरेंमध्ये बराच वेळ चर्चा झाली.

राज ठाकरेंनी शिवचं बिग बॉस बद्दल अभिनंदन केलं आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

(Shiv Thackeray's MNS entry? shiv meet Raj Thackeray after bigg boss 16)

शिव ठाकरे मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटल्यावर त्याच्याशी मीडियाने संवाद साधला. तुझा मनसे आणि राज ठाकरेंकडे कल जास्त वाढतोय असं शिवला विचारण्यात आलं. तेव्हा शिवने हसून या प्रश्नाचं उत्तर दिलं.

"तुमचा प्रश्न चांगला आहे. पण जेव्हा मला पक्ष आणि राजकारणापेक्षा तिथल्या माणसांची कदर आहे. जेव्हा मी कोणी नव्हते तेव्हा राजसाहेब आणि अमेय खोपकर माझ्या सोबत होते.

त्यांनी आत्ताही माझं कौतुक केलं आणि माझं अभिनंदन केलं. बिग बॉस सारखा हिंदी शो एका मराठी माणसाने गाजवला याचा त्यांना अभिमान आहे." अशा शब्दात शिव ठाकरेने मीडियाशी संवाद साधला.

दरम्यान शिव ठाकरेने राज ठाकरेची अचानक भेट घेतल्याने तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार का अशी चर्चा सगळीकडे सुरु झालीय. शिवने बिग बॉस १६ चं उपविजेतेपद पटकावलं.

बिग बॉसच्या १६ व्या सीझनमध्ये सलमाननं एमसी स्टॅनच्या नावाची घोषणा केली आणि शिवचे डोळे भरुन आले.

विजेतेपद जाहीर करण्यापूर्वी या दोन्ही मंडलींनी निकाल काहीही असो जिंकणारा व्यक्ती हा मंडलीचा असणार आहे याचा त्यांना विशेष आनंद होता. शिवला बिग बॉस १६ मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

PMPML Buses : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पीएमपीच्या ताफ्यात ४ महिन्यात येणार २००० नवीन बस; प्रवासीसंख्या २० लाखांवर नेण्याचे लक्ष्य

Malegaon News : मालेगाव जन्मदाखला घोटाळा: १ हजार २७३ दाखले रद्द, ५०० नागरिक गायब; २४ जणांनी परदेशात पलायन केल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, रेस्टॉरंट आणि बारमध्ये घुसून राडा

IND vs SA: गौतम गंभीरला प्रशिक्षकपदावरून काढून टाकायचं का? सौरव गांगुली म्हणतोय, ' याक्षणी तरी...'

SCROLL FOR NEXT