Shiv Thakare gets injured while performing a stunt in Khatron Ke Khiladi 13's last leg SAKAL
मनोरंजन

Colors KKK 13 : खतरो के खिलाडी 13 च्या सेटवर शिव ठाकरे गंभीर जखमी, हाताला टाके, बघा काय घडलं

Shiv Thakare : शिवला 'खतरों के खिलाडी 13' मध्ये स्टंटदरम्यान गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलंय.

Devendra Jadhav

KKK 13 Shiv Thakare News: 'खतरों के खिलाडी 13' या शोचं शूटिंग सध्या अंतिम टप्प्यावर आहे. अशातच खतरो के खिलाडी च्या सेटवरून मोठी बातमी समोर आलीय. त्यामुळे फॅन्सना काळजी वाटून राहिली आहे.

'खतरों के खिलाडी 13' मध्ये मराठमोळा शिव ठाकरे सहभागी आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण आता शिवला 'खतरों के खिलाडी 13' मध्ये स्टंटदरम्यान गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलंय.

(Shiv Thakare gets injured while performing a stunt in Khatron Ke Khiladi 13's last leg)

'खतरों के खिलाडी 13' च्या लेटेस्ट व्हिडिओमध्ये शिव ठाकरे हाताला झालेली जखम दाखवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या बोटांना टाके टाकल्याचे दाखवले आहे.

हा व्हिडिओ पाहून शिवचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत आणि अनेकांनी त्याला 'खतरों के खिलाडी 13' चा विजेता म्हणायला सुरुवात केली आहे,

याशिवाय त्याला शूर आणि बलवान म्हटले आहे. शिव ठाकरेंनी बोटांचा क्लोजअप दाखवला आहे, जिथे अनेक टाके दिसतात. शिव ठाकरेने इन्स्टा स्टोरीवर आणखी एक झलक शेअर केली आहे.

याआधी 'खतरों के खिलाडी 13' शो मध्ये सहभागी असलेली आणि 'बिग बॉस 16'मध्ये दिसलेली अर्चना गौतम 'खतरों के खिलाडी 13' मध्येही जखमी झाली होती.

अर्चना गौतमला हनुवटीच्या खाली मानेच्या अगदी वरती दुखापत झाली, तिथे टाके घालावे लागले.

'खतरों के खिलाडी 13' च्या सीझनमध्ये शिव ठाकरे आणि अर्चना गौतम व्यतिरिक्त डेझी शाह, शीझान खान, ऐश्वर्या शर्मा, अंजली आनंद, अंजुम फकीह, रुही चतुर्वेदी आणि अनेक स्टार्स रोहित शेट्टीच्या शोची मजा द्विगुणीत करण्यासाठी येत आहेत.

शोच्या शूटिंगदरम्यान अनेक जण जखमी झाल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. याआधी शो मध्ये सहभागी झालेल्या अनेक स्टार्सने माघार घेतलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT