Bigg Boss 16 Esakal
मनोरंजन

Bigg Boss 16: शिव ठाकरेचा बिग बॉसमधील प्रवास थांबला? पडला घराबाहेर..

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस 16 च्या ग्रँड फिनालेला काही दिवस बाकी आहेत. अशा परिस्थितीत, स्पर्धकाचे प्रत्येक पाऊल त्यांना जिंकू किंवा हरवू शकते. शिव ठाकरे, निमृत कौर, सुम्बुल तौकिर, एमसीस्टॅन, अर्चना गौतम, शालीन भानोत, प्रियांका चौधरी हे सात स्पर्धक सध्या घरात आहेत. या स्पर्धकांमध्ये घरात टिकून राहण्यासाठी जोरदार लढत सुरु आहे.

या आठड्यात घरातील मंडली मधील तिन सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यात शिव, स्टॅन आणि सुम्बुल तौकिर यांची नावे आहेत. मात्र आता शिव ठाकरेचा घरातील प्रवास थांबणार अशी चर्चा सुरु आहे.

बिग बॉस सुरु झाल्यापासून घरात शिव ठाकरेचं वर्चस्व पहायला मिळालं आहे. तो बऱ्याचवेळा घरात कॅप्टनही झाला . त्याचा चाहतावर्गही चांगला आहे. सुरवातीला त्याचा खेळ सर्वांनाच आवडला. मात्र त्यानंतर जसे जसे दिवस पुढे जावू लागला तसा त्याचा खेळही थोडा फिका पडला. खुद्द सलमान खान ही शिव ला याबद्दल होता.

शिव हा घरात खेळत नसुन तो फक्त घरात नाती सांभाळतोय असंही सलमान त्याला बोलला होता. मात्र त्याचे चाहते त्याच्या याच स्टाइलवर फिदा असतात. त्यांना शिवचा हाच स्वभाव खुप आवडतो त्यामुळे त्याला चागंले वोटही मिळतं होते.

मात्र सध्या एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात करण जोहर शो होस्ट करतांना दिसत आहे. खुद्द कलर्सच्या इस्टाग्रामवर हा व्हिडिओ निर्मात्यांनी शेअर केला आहे. यामध्ये या व्हिडीओमध्ये करण बोलतांना दिसतोय. मंडली कोणत्या तरी एका सदस्यामुळे तुटणार असं तो म्हणतो. मग निमृत म्हणते मंडली कधीच तुटणार नाही. मात्र आता घरातील एकाला घराबाहेर जावं लागणार असंही करण म्हणतो, .

त्यांनतर करण शिवला बोलतो की, 'तुला सगळ्यात कमी मतं आहे.बाय बाय चल ये' यानंतर घरातील सर्व सदस्यांना धक्का बसतो आणि शिवही घराबाहेर जात आहे. त्यामुळे आता शिवचा घरातील प्रवास संपला आहे का असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. या निर्णयामुळं नेटकरीही थक्क झाले आहेत.

मात्र सुंबूलला या वीकेंडला बिग बॉसमधून बाहेर काढले जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT