मनोरंजन

विराजससोबतच्या अफेअरच्या चर्चांवर शिवानीचं सूचक विधान, म्हणाली...

स्वाती वेमूल

मुंबई: सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या सेलिब्रिटी कपलच्या लग्नसोहळ्याला अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांनी एकत्र हजेरी लावत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. विराजस 'माझा होशील ना' या तर शिवानी 'सांग तू आहेस का' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. या दोन मालिका जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यातल्या या दोन कलाकारांमध्ये प्रेमाचं नातं फुलल्याच्या जोरदार चर्चा आहेत. या चर्चांवर आता शिवानीने मौन सोडलं असून नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंवर व्यक्त झाली आहे. 

'ई टाइम्स टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत शिवानी म्हणाली, "होय, आमच्यात खूप चांगली मैत्री आहे आणि आम्हाला एकमेकांचा सहवास खूप आवडतो. पण लोकांनी माझ्या आणि विराजच्या नात्याबद्दल बोलत राहावं, चर्चा करत राहावी आणि मनमोकळेपणाने अंदाज वर्तवले जावेत असं मला वाटतं. कारण त्यात एक वेगळीच मजा आहे."

सिद्धार्थ-मितालीच्या लग्नात विराजस आणि शिवानीने एकाच रंगसंगतीचे कपडे परिधान केले होते. विराजसने हिरव्या रंगाचा कोट परिधान केला होता आणि गुलाबी रंगाच्या साडीवर शिवानीने त्याच रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता. "सिद्धार्थ-मितालीच्या लग्नात आम्ही खूप धमाल केली. या खास सोहळ्यासाठी आम्ही दोघांनी ठरवून एकाच रंगसंगतीचे कपडे परिधान केले होते आणि त्यामागेही एक खास कारण आहे. पण त्याबद्दल मी आता काहीच सांगणार नाही. लोकांना अंदाज व्यक्त करण्याची मोकळीक मी देणार आहे," असं ती हसत म्हणाली. 

विराजस आणि शिवानी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा असून या दोघांना याआधीही अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे. मात्र दोघांनीही अद्याप रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली माध्यमांसमोर दिली नाही.

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Shivani Rangole breaks silence on her relationship with Virajas Kulkarni

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: सोन्याचे दागिने महागणार? हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67% वाढ; बिल किती वाढणार?

Ajit Agarkar च्या जागी कोण? रोहित शर्माशी पंगा महागात पडला, BCCI ने शॉर्टलिस्ट केली दोन नावं, दोघांचेही मुंबई इंडियन्सशी कनेक्शन

सव्वा पायलीचा भात, नऊ भाज्या आणि... माहेरवाशीण नाही बांदेकरांकडे सुना बसवतात गौरी, पूजा बिरारी म्हणते-

Latest Marathi News Update : शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

Social Media Addictive Features: ‘सोशल मीडिया’वर नियंत्रण शक्य? वापर कमी करण्यासाठी उपाय हवेत : उच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT