Shivani Surve Wedding esakal
मनोरंजन

Shivani Surve Wedding : शिवानी सुर्वेचं 'शुभमंगल'! अजिंक्य सोबत झाली विवाहबद्ध

मराठी मनोरंजन विश्वात आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये शिवानीचे नाव घ्यावे लागेल.

युगंधर ताजणे

Shivani Surve Wedding : मराठी मनोरंजन विश्वात आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये शिवानीचे नाव घ्यावे लागेल. शिवानीचं आज लग्न झालं असून (Shivani Surve Wedding News) तिच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी तिला तिच्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

नुकताच शिवानीचा साखरपुड्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्या लग्नाची चर्चा (Shivani Weds with Ajinkya Nanaware) रंगली होती. अखेर ती अजिंक्य सोबत विवाहबद्ध झाल्याचे दिसून आले आहे. राजश्री मराठीनं त्यांच्या लग्नाचा तो खास व्हिडिओ चाहत्यांसाठी शेयर केला आहे.

आपल्या हटक्या शैलीच्या अभिनयासाठी आणि स्टाईलसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवानीचा (Shivani Latest Marathi News) चाहतावर्ग मोठा आहे. तिला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशावेळी आपल्या आवडत्या सेलिब्रेटीचं लग्न होत आहे याची चाहत्यांना मोठी उत्सुकता होती. यापूर्वी शिवानीच्या व्हायरल झालेल्या फोटोंना आणि व्हिडिओला (Shivani Wedding News) चाहत्यांची मोठी पसंती मिळाली होती.शिवानीच्या लग्नाला मराठी मनोरंजन विश्वातील वेगवेगळे सेलिब्रेटी देखील उपस्थित होते. यात अभिनेता कुशल बद्रिकेसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

शिवानी आणि अजिंक्यची ओळख तू जीवाला गुंतवावे या मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यांच्या मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर त्या दोघांनी सप्तपदी पूर्ण करत वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली आहे. चाहत्यांनी त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओला शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT