Shivaji Maharaj Song SakalNews
मनोरंजन

Shivjayanti 2022: मुहूर्तावर घुमला 'माझा जाणता राजा'चा आवाज

'अनकट मराठी' या युट्यूब चॅनलने एक नवीन मराठी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारीला जयंती असते. याचे औचित्य साधत 'अनकट मराठी' या युट्यूब चॅनलने एक नवीन मराठी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. 'माझा जाणता राजा' असे गाण्याचे नाव आहे. मायभूमी भयभीत होता यवन मातला; सह्याद्रीचा एक कडा मग पेटून ऊठला, असे गाण्याचे बोल आहेत. गाण्यामध्ये मराठी अभिनेता उपेंद्र लिमये, ऋषभ मोरे, तन्मय पटेकर, गायत्री कोरपे, श्रद्धा टक्के-पाटील, स्नेहल प्रधान, सोहम चाकणकर आदींनी अभिनय केला आहे. (Shivjayanti Song)

प्रेक्षकांच्या पसंतीला हे गाणे उतरत असून आशिष गायकवाड आणि जयपाल गायकवाड यांनी या गाण्याची निर्मीती केली आहे. कपिल जोंधळे यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले असून प्रशांत सातोसे आणि रिमी धर यांनी हे गाणे गायले आहे. तर, गाण्याला दुर्गेश राजभट्ट आणि डी जे वभैव यांनी संगितबद्ध केले आहे.

शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या आधी दोन दिवस म्हणजेच १७ फेब्रुवारीला हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. त्यामुळे ऐन शिवजयंतीला महाराजांवर आलेले गाणे प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरत असून त्यांच्या पसंतीलाही उतरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आणि उर्जास्त्रोत आहेत. त्यामुळेच हे गाणे बनविण्यात आले असून हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत असल्याचा आनंद असल्याची भावना निर्माते जयपाल गायकवाड यांनी बोलून दाखविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: चलो दिल्ली! मराठे दिल्लीत धडकणार, देशभरातील मराठ्यांना मनोज जरांगे करणार एकत्र

Election Commission Decision: बिहार निवडणुकीआधी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! आता 'EVM'वर दिसणार उमेदवाराचा रंगीत फोटो अन्...

Nano Banana AI 3D Video Prompt: मॉडेल इमेजेसनंतर आता 3D व्हिडिओ ट्रेंड, एका मिनिटापेक्षा कमी वेळात तयार करा खास व्हिडिओ

Latest Marathi News Updates : मीनाताई ठाकरे पुतळ्याचा अवमान, दोषींना अजिबात सोडले जाणार नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pre-Wedding Photoshoot: प्री-वेडिंग शूट करायचंय? मग साताऱ्याचं कास पठार आहे एक परफेक्ट ठिकाण!

SCROLL FOR NEXT