Kiran Mane, Adesh Bandekar 
मनोरंजन

'किरण मानेंना मोठं व्हायचंय म्हणून..'; मनसेनंतर शिवसेनाही विरोधात

वाचा, काय म्हणाले आदेश बांदेकर?

स्वाती वेमूल

अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना मालिकेतून काढल्यानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यामध्ये काहींनी मानेंच्या समर्थनार्थ हात पुढे केला, तर काहींनी माने यांना पब्लिसिटी हवं आहे, म्हणून ते असं करत असल्याची टीका केली. एकीकडे मनसेनं किरण मानेंविरोधी भूमिका घेतल्यानंतर आता शिवसेनेच्या आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनीसुद्धा मानेंच्या विरोधात प्रतिक्रिया दिली आहे. 'किरण माने यांना मोठं व्हायचंय म्हणून ते हे सगळं करत आहेत', अशी टीका बांदेकर यांनी केली.

काय म्हणाले आदेश बांदेकर?

"गेल्या अनेक वर्षांपासून मी या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. पण इतक्या दिवसांत मला असा कोणताही अनुभव आला नाही. कुठलीही वाहिनी असं करत नाही. किरण मानेंच्या मताशी मी सहमत नाही. त्यांना मोठं व्हायचंय म्हणून हे सगळं करत आहेत", असं बांदेकर म्हणाले.

मनसेची भूमिका-

"किरण माने यांनी मालिकेतील इतर कलाकारांना त्रास दिला. त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आलं. या सगळ्यावर योग्य वेळी मनसे आपली भूमिका मांडेल", असं मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले.

आरोपांवर किरण मानेंचं स्पष्टीकरण-

"मी सेटवर गैरव्यवहार केला नाही. जर मी गैरवर्तणूक करत होतो, तर कलाकार का गप्प होते? ही वेगळीच स्क्रीप्ट लिहिली जात आहे. अशा गोष्टींना मी घाबरत नाही. माझ्या राजकीय पोस्टमुळेच मला मालिकेतून काढण्यात आलं आहे. मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसविरोधात मी कोर्टात लढणार. माझ्या नावाची बदनामी सुरू आहे. शर्वणी पिल्लई आणि सविता मालपेकर या माझ्या बहिणी आणि आईसारख्या आहेत. एवढे दिवस त्यांनी माझा त्रास का सहन केला? मी कोणत्याही महिलेशी गैरवर्तन केलं नाही. याविरोधात मी शेवटपर्यंत लढा देणार, मला मालिकेत परत नाही घेतलं तरी चालेल", अशी प्रतिक्रिया मानेंनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT