Shoaib Malik marries Pakistani actress Sana Javed sakal
मनोरंजन

माझ्या आयुष्यातील एक झलक, शोएबने तिसऱ्यांदा बांधली लग्नगाठ अन् सानियाने शेअर केला घरातला video

Shoaib Malik marries Pakistani actress Sana Javed: पाकिस्तानचा स्टार माजी क्रिकेटपटू शोएब मलिक तिसऱ्यांदा विवाह बंधनात अडकला आहे. यासंदर्भातील फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पाकिस्तानचा स्टार माजी क्रिकेटपटू शोएब मलिक तिसऱ्यांदा विवाह बंधनात अडकला आहे. यासंदर्भातील फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यानंतर शोएब मलिक आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्या संबंधांबाबत पुन्हा चर्चांना तोंड फुटलं आहे. त्यातच सानियाने काही तासांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात ती क्रिकेटबाबत भाष्ट करताना दिसत आहे. (Shoaib Malik marries Pakistani actress Sana Javed amid rumours of separation Sania Mirza share videos of home)

सानियाने इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर केलाय, यात तिने आपल्या घराची काही माहिती दिली आहे. तसेच यात काही विचारलेल्या प्रशांनी तिने उत्तरं दिली आहेत. टेनिस सोडून तुला कोणता खेळ आवडतो, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावर ती म्हणतेय की, 'टेनिस सोडून मला क्रिकेट खेळायला आवडेल. कारण मी एक भारतीय आहे. शिवाय माझ्या घरात खूप क्रिकेटचं वातावरण आहे.'

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा या दोघांमध्ये बिनसल्याच्या खूप दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. दोघे वेगळे झालेत अशाही बातम्या येत होत्या. त्यातच आता शोएबने लग्न केल्याचं समोर आलंय. त्यामुळे शोएब आणि सानिया वेगळे झाले असतील अशी शंका घेण्यास वाव निर्माण झाला आहे. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत विवाह केला आहे.

शोएब-सानिया यांचे लग्न

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचे लग्न १२ एप्रिल २०१० मध्ये झाले होते. त्यावेळी पाकिस्तान आणि भारतामध्येही बरीच चर्चा घडून आली. वादही बराच झाला. दोघांना २०१८ मध्ये एक मुलगाही झाला आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचं सांगण्यात येतं. तेव्हापासूनत ते वेगळे राहू लागले होते.

शोएबची नवी पत्नी कोण आहे?

सना जावेदचा जन्म २५ मार्च १९९३ रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे पाकिस्तानी कुटुंबात झालाय. सना ही पाकिस्तानमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे, तिचे २०२० मध्ये गायक उमेर जसवाल याच्यासोबत लग्न झाले होते, पण लग्नानंतर ती काही महिन्यातच नवऱ्यापासून वेगळी झाली. मॉडेलिंग करिअरमध्ये तिने आपली छाप सोडली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपचे आरएसएसशी मतभेद? संघाचे माजी पदाधिकारी राम माधव म्हणाले, 'दोन्ही संघटना एकाच विचारसरणीच्या, पण...'

'हा कुत्रा खाऊन आलाय का, सारखा भूंकतोय!' इरफान पठाणने केली शाहिद आफ्रिदीची बोलती बंद; मग पुढे काय, झाला ना राडा...

Whatsapp Call Schedule : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलं कॉल शेड्यूल फीचर, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Latest Maharashtra News Updates : अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात ढगफुटी पावसामुळे संत्रा बागांचे मोठे नुकसान

Pune : पुण्यात मद्यधुंद चालकानं डीसीपींच्या गाडीला दिली धडक, मुलगी जखमी; दोघांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT