shooting of Dhanush dns upcoming film was stopped by the police, this is the reason
shooting of Dhanush dns upcoming film was stopped by the police, this is the reason  SAKAL
मनोरंजन

Dhanush: धनुषच्या आगामी सिनेमाचं शुटींग पोलिसांनी थांबवलं, हे आहे कारण

Devendra Jadhav

Dhanush Movie News: धनुष नुकताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या 'कॅप्टन मिलर' या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटानंतर धनुषने नव्या चित्रपटाची तयारी सुरू केली.

धनुषने दिग्दर्शक शेखर कममुलासोबत डीएनएस या चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. या चित्रपटाचा काही भाग तिरुपतीमध्ये शूट होणार होता. मात्र पोलिसांची परवानगी न मिळाल्याने शूटिंग थांबले आहे.

'पिंकविला'च्या रिपोर्टनुसार, 'डीएनएस' चित्रपटाची मुहूर्त पूजा काही आठवड्यांपूर्वी झाली होती. त्यानंतर शूटिंगला सुरुवात झाली. धनुष व्यतिरिक्त चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे पहिले शेड्युल तिरुपतीमध्ये होते. मात्र परवानगी न मिळाल्याने शूटिंग थांबवण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांनी भाविकांना मंदिरातून बाहेर काढले?

वृत्तानुसार 'डीएनएस'चे शूटिंग तिरुपती पर्वताच्या पायथ्याशी होणार होते. त्यासाठी बससह वाहने आणि कार इतर मार्गावर वळवाव्या लागल्या. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. चित्रपटाच्या क्रू मेंबर्सनी भक्तांना मंदिराबाहेर पाठवले कारण त्यांना गोविंदराजा स्वामी मंदिराबाहेर शूटिंग करायचे होते. त्यामुळे पोलिसांना येऊन शुटींग थांबवावं लागलं.

पोलिसांनी परवानगी दिली नाही

यामुळे चित्रपटाच्या क्रूविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर तिरुपती पोलिसांनी डीएनएस टीमला तिथे शूटिंग करण्याची परवानगी नाकारली.

त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबले. डीएनएस या चित्रपटाव्यतिरिक्त धनुष आणखी एका चित्रपटात दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

SCROLL FOR NEXT