ShahRukh Khan Team eSakal
मनोरंजन

शाहरुख खानच्या 'पठान'चं शुटींग पुन्हा थांबलं

शाहरुख खानच्या पठान चित्रपटाच्या शुटींगला अनेक अडथळे येत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

बॉलिवूडचा (Bollywood) बादशाह शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) कमबॅकची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुख खान बऱ्याच दिवसांपासून त्याच्या 'पठाण' (Pathan Movie) चित्रपटासाठी काम करतोय. मात्र अडथळे कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. आतापर्यंत अनेकदा वेगवेळ्या कारणांमुळे शाहरुख खानच्या 'पठाण'चे शूटींग पुढे ढकलण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा तोच प्रकार घडला आहे.

पठाण चित्रपटांचं शुटींग आतापर्यंत वेगवेळ्या कारणांमुळे थांबलं आहे. आधी कोरोना व्हायरस, नंतर शाहरुख खानच्या वैयक्तिक आयुष्यातील समस्या आणि आता ओमिक्रॉन व्हेरीअंटच्या धोक्यामुळे 'पठाण'च्या शूटिंगमध्ये अडथळा आला आहे. शाहरुख खान 'पठाण' चित्रपटाचे शूटिंग स्पेनमध्ये करणार होता, ते आता होणार नाही. चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने याबाबत माहिती दिली आहे.

यापूर्वी, ऑक्टोबरमध्येच स्पेनमध्ये शूटींग होणार होते. इथे चित्रपटाची दोन गाणी आणि काही अॅक्शन सीन्स चित्रित होणार होते. मात्र तसं झाले नाही, कारण शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकल्यामुळे तो ब्रेकवर होता. आता आम्ही जानेवारीत शुटींग करण्याचं ठरवलं होतं, मात्र स्पेनमध्ये सर्वाधिक कोविड-19 रुग्ण असल्यानं शुटींग पुढे ढकलण्यात आलं आहे. त्यामुळे आता शाहरुख खानच्या चाहत्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT