cintaa
cintaa 
मनोरंजन

सध्या तरी चित्रीकरण होणार नाही; सिंटा आणि फेडरेशनचा निर्णय... 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र सरकारने परवानगी दिल्यानंतर काही नियम व अटींनुसार उद्यापासून येथील काही ठिकाणी चित्रीकरण सुरू होणार होते. परंतु फेडरेशन आणि सिंटा या चित्रपट व टीव्ही इंडस्ट्रीशी संबंधित असलेल्या संघटनांच्या आज झालेल्या बैठकीत चित्रीकरण न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लाईट, अॅक्शन आणि कॅमेरा हा आवाज सध्या तरी येथील कोणत्याही स्टुडिओत ऐकू येणार नाही.

 ब्राॅडकास्टर्स, सिंटा व प्रोड्युसर्स गिल्ड असोसिएशन यांची एकत्रित एक बैठक पाचेक दिवसांपूर्वी झाली होती. त्या बैठकीत विविध मुद्दे व काही प्रश्न चर्चिले गेले होते. पण त्या संदर्भात ब्राॅडकास्टर्स तसेच प्रोड्युसर्स गिल्डकडून अजून काही उत्तर  न मिळाल्यामुळे चित्रीकरण न करण्याचा निर्णय झाला आहे. याबाबत सिंटाचे उपाध्यक्ष मनोज जोशी म्हणाले, की कलाकार तसेच तंत्रज्ञ व कामगारांना ९० दिवसांनी त्याच्या कामाचा मोबदला दिला जातो. हा नियम जुना असून सध्या तीन महिने कुणालाच काम नाही.

 त्यामुळे तो मोबदला तीस दिवसांत मिळावा तसेच कामाचे तास आठच असावेत असे काही आमचे मुद्दे होते. ते अजूनही मान्य झालेले नाहीत. सध्याची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे सगळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांच्या विम्याचा प्रश्न आहे. सेटवर डाॅक्टर असणे आवश्यक आहे...असे काही मुद्दे होते. कित्येक कलाकारांचे कामाचे पैसे अजूनही काही प्राॅडक्शन हाऊसनी दिलेले नाहीत.

आम्ही ठेवलेले अनेक मुद्दे अजूनही जसेच्या तसे आहेत. त्याबाबतीत आम्हाला त्यांच्याकडून काही उत्तर आलेले नाही. त्यामुळे चित्रीकरण करता येणार नाही. हा उद्योग जगावा आणि मोठा व्हावा अशी आमची मनोमन इच्छा आहे. पण टाळी एका हाताने वाजत नाही ना. फेडरेशनचे अध्यक्ष बी. एन. तिवारी म्हणाले, की  निर्माते व वाहिन्यांनी ५० लाखाचा प्रत्येकाचा विमा उतरवावा असे आम्ही सांगितले. त्यांनी केवळ २५ लाख रुपयांचा विमा उतरवू असे सांगितले. 

कामगार आणि कलाकार यांची ह्युमॅनिटी उत्तम रहावी याकरिता आठ तास काम करणे आवश्यक आहे. कारण आपल्याकडे बारा बारा तास काम चालते आणि सध्याच्या घडीला ते शक्य नाही. पण त्याबाबतीतही काही आम्हाला काही सांगण्यात आले नाही. त्यामुळे चित्रीकरण न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. 

shooting will not start now said Cintaa and federation 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT