Shraddha Kapoor beats Deepika Padukone instagarm popularity
Shraddha Kapoor beats Deepika Padukone instagarm popularity  
मनोरंजन

श्रध्दाने दीपिकाला टाकले मागे;  इंस्टाग्राम टॉप 3 मध्ये 'साहो गर्ल' 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडमधल्या बहुतांशी सेलिब्रेटी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. त्या प्रत्येकाचा फॅनफॉलोअर मोठा आहे. त्यावर वेगवेगळ्या विषयांवर कमेंट करुन ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. मोठया अभिनेत्यांच्या जोडीला अभिनेत्रींचाही या सोशल मीडियावर चांगला बोलबाला आहे. त्यातील इंस्टाग्राम या सोशल मीडियाने सर्वाधिक फॅनफॉलोअर्स असणा-या अभिनेत्रीचे नाव जाहीर केलं आहे. 

इंस्टावर सर्वाधिक फॅनफॉलोअर्स मिळविण्याच्या बाबतीत श्रध्दा कपूरनं दीपिकाला मागे टाकले आहे. ती सर्वाधिक फॅनफॉलोअर्स असणा-यांच्या यादीत तिस-या स्थानावर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दीपिका आणि श्रध्दा यांच्यात तिस-या क्रमांकासाठी मोठी चुरस होती. मात्र साहो चित्रपटाची अभिनेत्री असणा-या श्रध्दाने आपल्या फॅनफॉलोअर्सची संख्या वाढवली आहे. त्यामुळे ती भारतात इंस्टाग्रावर सर्वाधिक लोकप्रिय असणा-यांच्या यादीत तिस-या स्थानावर आहे. 

केवळ भारतातच नव्हे तर जगभरात इंस्टाग्राम हे अॅप प्रचंड लोकप्रिय आहे. एक फोटो शेअरिंग अॅप म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्यावर व्हिडिओ शेअरिंग करणा-यांची संख्या मोठी आहे. याला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. यासगळ्यातून मिळणारा व्यवसाय हा कित्येक कोट्यवधी रुपयांचा आहे. अशाप्रकारच्या नवीन माध्यमाचा परिणामही तितक्याच व्यापक पध्दतीने होत असल्याचे दिसून आले आहे. विशेषत तरुणाई या अॅपचा वापर करताना दिसत आहे.

भारतात सध्या इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणा-यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा क्रमांक आहे. त्याचे 82.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यांच्यानंतर प्रियंका चोप्राचा क्रमांक असून तिला 58.1 फॉलोअर्स आहेत.

यानंतर अनुक्रमे श्रध्दा कपूर (56.4) आणि दीपिका पादुकोण (52.3) यांचा क्रमांक लागतो. यांच्याशिवाय बॉलीवूडमधल्या आणखी काही सेलिब्रेटींच्या फॅनफॉलोअर्सची संख्या मोठी आहे. यात अलिया भट (50.1), नेहा कक्कर (48.2), अक्षय कुमार (46.8) जॅकलिन फर्नांडिझ (46.2) कतरिना कैफ (44.8) यांची नावे आहेत. भारताचे पंतप्रधान मोदी यांच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सची संख्या ही 49.7 मिलियन इतकी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT