siddhant kapoor 
मनोरंजन

अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या भावाला कोरोना व्हायरसची लागण

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांतला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तो सध्या गोव्यात आहे जिथे त्याने कोविडची टेस्ट केली आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. सिद्धांत कपूरचे वडिल शक्ती कपूर यांनी मिडियाला याआधी सांगितलं होतं की माझ्या मुलाला कोविड-१९ची लक्षणं जाणवत आहेत. त्यामुळे तो कोविड-१९ची टेस्ट करत आहे. तर काही मिडिया रिपोर्ट्सनुसार स्वतः सिद्धांतने तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं कन्फर्म केलं आहे.  

सिद्धांत कपूरने ई टाईम्सला सांगितलं की, रविवारी माझी तोंडाची टेस्ट निघून गेली होती. मला वाटलं आता टेस्ट करायला हवी आणि माझी टेस्ट पॉझिटीव्ह आली. मी गोव्यात आहे. आमचं इथे घर आहे. देवाची कृपा आहे की मी मुंबईमध्ये गर्दीत आणि ट्रॅफिमध्ये नाहीये. मी स्वतःला क्वारंटाईन केलं आहे. मला वाटतं की मी काही दिवसात ठिक होईन. 

सिद्धांत कपूर शेवटचा भूत-पार्ट वन द हॉन्टेड शिपमध्ये दिसून आाला होता. याशिवाय तो अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मीसोबत आगामी सिनेमा चेहरेमध्ये दिसणार आहे. हा सिनेमा जुलै २०२० मध्ये रिलीज होणार होता. मात्र कोरोनाच्या कारणामुळे आता ही तारिख पुढे ढकलण्यात आली आहे.   

shraddha kapoor brother siddhanth tests covid 19 positive in goa says quarantined myself  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT