Shraddha Kapoor Sakal
मनोरंजन

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरनं सांगितलं तिचं पहिलं प्रेम! व्हिडिओ शेअर करत...

नुकतेच 'तू झुठी मैं मक्कार' या चित्रपटाचे नवीन गाणेही रिलीज करण्यात आले.

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी 'तू झुठी मैं मक्कार' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात श्रद्धा पहिल्यांदाच रणबीर कपूरसोबत पडद्यावर दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवीन गाणेही रिलीज करण्यात आले. या सगळ्या दरम्यान अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे 'प्रेम' उघड केले आहे.

श्रद्धा कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, "आप लोग किसके प्यार में भीगे भीगे? मला कमेंट्समध्ये सांगा आणि #TerePyaarMein वर स्वतःची रील बनवा".

व्हिडिओमध्ये, श्रध्दा बॅकग्राउंडमध्ये 'तेरे प्यार में' गाणे वाजत आहे आणि पाणीपुरीच्या थाळीचा आस्वाद घेताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये 'स्त्री' अभिनेत्री गुलाबी कुर्ता परिधान करून आणि खुल्या केसांसह खूपच सुंदर दिसत आहे.

श्रद्धाने व्हिडीओ इन्स्टावर शेअर करताच. चाहत्यांनी रेड हार्ट आणि फायर इमोटिकॉन्सने कमेंट सेक्शन भरले आहे. चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले की, "श्रद्धा आणि खाणे ही एक न संपणारी गोष्ट आहे." त्याचवेळी दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, "किती प्लेट पोटात गेल्या".

श्रद्धाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच ती अभिनेता रणबीर कपूरसोबत 'तू झुठी मैं मक्कार' या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे आणि तो 8 मार्च 2023 रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

बुधवारी, निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले गाणे 'तेरे प्यार में' रिलीज केले, ज्याला चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. 'तेरे प्यार में' मध्ये ताजेपणा आणि रोमान्स आहे. हे गाणे प्रीतमने संगीतबद्ध केले आहे, निकिता गांधीसह अरिजित सिंगने गायले आहे आणि त्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT