Shramesh Betkar on Tomato Price Hike News:  Esakal
मनोरंजन

Shramesh Betkar on Tomato Price: 'आता टोमॅटो थेट बँकेतच..', भाववाढीनंतर हास्यजत्रा फेम अभिनेत्याची महागाईवर पोस्ट चर्चेत

Vaishali Patil

Shramesh Betkar on Tomato Price Hike News:

गेल्या महिनाभरात टोमॅटोच्या दर गगणाला भिडले आहे. काही दिवसातच टोमॅटोच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. टोमॅटोच्या किमतीमुळे स्वयंपाकघराचं आणि गृहिणींचं आर्थिक बजेट कोलमडल.

पावसाळ्यात टोमॅटोबरोबरच इतर भाज्यांच्या दरातही कमालीची वाढ होते मात्र टोमॅटोनं जरा हाईटच केली.

देशाच्या कानाकोपऱ्यात टोमॅटोचे वाढते दर रोज नवनवे विक्रम करत आहेत. टोमॅटोचा भाव 100 रुपये किलोच्या पुढे गेला आहे. मात्र याचा फायदा खरचं शेतकही बांधवांना होत आहे की असा सवालही आहेच.

मात्र बाजारपेठेत वाढलेल्या टोमॅटोच्या किमतींवर आता कलाकराही प्रतिक्रिया देत आहे. पोस्ट शेयर करत महागाईवर वार करत आहे.

आता त्यातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता श्रमेश बेटकर यानेही इस्टाग्रामवर स्टोरी शेयर करत त्याच्या विनोदी शैलीत वाढत्या महागाईवर निशाणा साधला आहे. सध्या त्याची ही स्टोरी व्हायरल झाली असुन नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देत आहे.

तर आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता श्रमेश बेटकर त्याच्या विनोदी यंदाजात या महागाईवर व्यक्त झाला. टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतीबद्दल त्याने शेअर केलेली इन्स्टाग्राम स्टोरी आता चर्चेत आली आहे

महाराष्ट्राची हास्यजत्रा शो सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा शो बंद असला तरीही सर्व कलाकार प्रेक्षकांचे लाडके आहेत. त्यातलाच श्रमेश बेटकर हा देखील एक कलाकार आहे. तो अशा अनेक मुद्यावर भाष्य करत असतो. पोस्ट द्वारे त्याचे म्हणणे चाहत्यांना सांगत असतो.

Shramesh Betkar on Tomato Price Hike News:

टोमॅटोच्या वाढत्या किंमतीवर लिहितांना त्याने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. त्याफोटोवर तो लिहितो की, "सकाळपासून एकच गोष्ट कळत नाहीये, टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवू की बँकेत? #महागाई " त्याची ही पोस्ट चर्चेत आली आहे. मात्र त्यानंतर ती स्टोरी डिलिट केली.

याआधीही राखी सांवतने टोमॅटोच्या वाढत्या भावावर प्रतिक्रिया दिली होती. आता मी चटणीत काय टाकू असा विनोदी सवालही तिनं केला होता.

अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीही पोस्ट शेयर करत टोमॅटोचे भाव वाढले असं म्हणाऱ्यांचा समाचार घेतला होता.

'दोन दिवस टोमॅटो महाग झालाय तर मिडीयात लईच आग लागलीये.. ईथे वर्षभर भाव मिळत नाही म्हणुन सडून जातो तेंव्हा सगळे गप्पगार..#लाल चिखल". त्याची पोस्टही चर्चेत आली. नेटकऱ्यांनी त्याच्या पोस्टला कमेंट करत पाठिंबा दर्शवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack : कुत्र्यांनी वाचवले मालकाचे प्राण! मेंढपाळांवर बिबट्याचा हल्ला; मात्र कुत्र्यांनी केलेला हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू

Thane Traffic: बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! मार्गावर तब्बल ८०० खड्ड्यांच साम्राज्य

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Pune News : पतीला अर्ध यकृत दिल, प्रत्यारोपणनंतर पत्नीसह दोघांचाही मृत्यू; पुण्यातील रुग्णालयात घटनेने खळबळ

दोन महिन्यात उजनीतून सोडले 97 TMC पाणी! उजनी धरणाचे 16 दरवाजे 3 फुटाने उघडले; भीमा नदीतील विसर्ग 45 हजार क्युसेक, पंढरीतील पूरस्थिती आज पूर्वपदावर

SCROLL FOR NEXT