Katrina Kaif, Aamir khan Google
मनोरंजन

'या' अभिनेत्रींनी 'धूम ३' मधील कतरिनाच्या रोलसाठीऑडिशन दिली होती...

रीजेक्ट होऊनही आज दोघीपण बॉलीवूडमध्ये नाव कमावतायत...

प्रणाली मोरे

यशराज फिल्मचा पहिला 'धूम' सिनेमा जितका चालला तितका 'धूम २' आणि 'धूम ३' फारसे चालले नाहीत. उलट दुस-या आणि तिस-या धूम सिरीजमध्ये अनुक्रमे ह्रतिक रोशन आणि आमिर खानसारखे मोठे हिरो होते,ज्याच्या उलट अभिनयात फारशी कमाल न दाखवलेला पण तरिही आपल्या बॉडी तसंच लूकमुळे तरुणाईत चर्चेित असलेला जॉन अब्राहमला घेऊन केलेला पहिलाच 'धूम' सिनेमा कमाल करून गेला. आता एवढं सगळं सविस्तर सांगण्याचं कारण हेच की या सिनेमात दरवेळेला हिरोंप्रमाणे लीडची हिरोईनही नेहमी मोठी घेण्यात आली. पहिल्या 'धूूम' सिनेमात होती इशा देओल,तर 'धूम २' मध्ये ऐश्वर्या राय-बच्चन आणि 'धूम ३' मध्ये कतरिना कैफ. 'धूम ३' मध्ये कतरिना-आमिर जोडी आधीपासनंच पडद्यावर कशी वाटेल याबाबत शंका होती. पण ही जोडी ब-यापैकी उत्तम दिसली असं म्हणायला हरकत नाही.

Vaani Kapoor,Shreya Dhanwanthary

आता आपण बातमी वाचताना म्हणाल,'मुद्द्याचं बोला'. नको त्या वायफळ गोष्टी कशाला सांगताय. तर मग येऊया मुळ मुद्द्यावर. त्याचं झालं असं की 'धूम ३' सिनेमात कतरिना ही यशराजवाल्यांची पहिली पसंत नव्हतीच मुळी. त्यांना नवीन चेहरा आणायचा होता. त्यासाठी ते ऑडिशन घेत होते. बरं त्यातही गम्मत आहे. ही ऑडिशन कोण घेत होतं तर भूमी पेडणेकर. आता भूमी तेव्हा यशराजच्या शानू शर्मा या कास्टिंग डायरेक्टरची सहाय्यक होती. तर कतरिनाने जी भूमिका 'धूम ३' मध्ये केलीय त्या भूमीकेसाठी 'शुद्ध देसी रोमान्स' या यशराजच्याच सिनेमातनं सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलेली वाणी कपूर आणि 'व्हाय चीट इंडिया' या सिनेमातनं इम्रान हाश्मीसोबत लीडमध्ये दिसलेली श्रेया धनवंथरी यांनीही ऑडिशन दिल्या होत्या. म्हणजे त्यांना यशराजकडून बोलावणं आलं होतं.

बरं त्या ऑडिशनमध्ये दोघींनाही गोड बोलून रीजेक्ट करण्यात आलं, पण 'यशराजकडून पुढच्या एखाद्या फिल्ममध्ये नक्की घेऊ' असं आश्वासन देण्यात आलं. यशराजनं वाणी कपूरच्या बाबतीत शब्द पाळला. कारण 'शुद्ध देसी रोमान्स' या यशराजच्या सिनेमात वाणीनं सुशांत सिंग राजपूतसोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. तर श्रेयाला भले यशराजसोबत काम करता आलं नसलं तरी एरव्ही दिल्लीतच राहणा-या श्रेयानं कामासाठी मुंबईचा रस्ता धरला आणि मेहनत करून बॉलीवूडमध्ये रीतसर एंट्री करून आपला प्रवास सुरू केला. नुकत्याच एका मुलाखतीत श्रेया धनवंथरीनं कबूल केलं की तेव्हा 'धूम ३' च्या ऑडिशनला मी रीजेक्ट झाले पण तेच माझ्या बॉलीवूड एंट्रीचं निमित्त ठरलं. वाणी कपूरही त्यानंतर 'बेफ्रिकी','बेलबॉटम','वॉर' या सिनेमांमधनं बडया स्टार्ससोबत दिसली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: ''कितीही दबाव आला तरी आम्ही सहन करू'', 'ट्रम्प टॅरिफ'वरुन मोदी स्पष्ट बोलले

AI Use in Ganeshotsav Crowd गणेशोत्‍सवातील गर्दीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी ‘एआय’चा वापर

ED Action: धर्मांतर टोळीचा मास्टरमाइंड चांगूर बाबाला 'मनी लाँड्रिंग' प्रकरणात ‘ED’चा दणका!

सरकारचा आदेश निघाला! ५२ हजार २७६ शिक्षकांसाठी मोठा निर्णय, अशंत: अनुदानावरील शाळांना २० टक्के वाढीव टप्पा अनुदान मंजूर, १ ऑगस्टपासून मिळणार अनुदान

Latest Marathi News Updates: निफाड साखर कारखान्याला पिंपळस ग्रामपालिकेडून सील

SCROLL FOR NEXT