Shreyas talpade Birthday why shreyas talpade kept his wedding with dipti under wraps  sakal
मनोरंजन

Shreyas Talpade Birthday: घरच्यांची संमती असतानाही श्रेयसनं चोरून केलं लग्न.. कारण..

अभिनेता श्रेयस तळपदेचा आज वाढदिवस, त्यानिमित्ताने जाणून घेऊया ही खास बात..

नीलेश अडसूळ

Shreyas Talpade Birthday: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने विशेष ओळख निर्माण करणारा कलाकार म्हणजे श्रेयस तळपदे (Shreyas Talpade). आज श्रेयसने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

नुकतच त्याच्या 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेने निरोप घेतला. ह्या मालिकेमुळे श्रेयस अधिकच प्रेक्षकांच्या जवळ गेला. त्यामुळे आज त्याच्या वाढदिवशी त्याच्यावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव होत आहे.

याच निमित्ताने आपण पाहूया, त्याच्या लग्नाबाबतची एक खास गोष्ट.. जी क्वचितच कुणाला माहीत आहे.

(Shreyas talpade Birthday why shreyas talpade kept his wedding with dipti under wraps )

हेही वाचा- ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

श्रेयसने 2007 साली दिप्ती तळपदेसोबत (Dipti Talpade) लग्न केले. पण त्याने ही गोष्ट कुणालाही सांगितली नव्हती. अत्यंत छुप्या पद्धतीने अवघ्या एका दिवसात हा लग्नसोहळा त्याने उरकला होता.

पण ही लग्न त्याला सगळ्यांपासून लपवावे लागले, त्यामागेही एक खास कारण आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितले की, 'इकबाल’ Iqbal या चित्रपटासाठी त्याला दिप्तीसोबतचे नाते लपवावे लागले होते.

झाले असे की, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागेश कुकनूर यांच्यासोबत श्रेयसने 'इकबाल' सिनेमा केला. या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी श्रेयसने नागेशला 31 डिसेंबरला सुट्टी मागितली होती.

त्यावेळी नागेशला वाटले की श्रेयस न्यू ईयरच्या पार्टीसाठी सुट्टी मागत आहे. जेव्हा त्याने श्रेयसला सुट्टीचे कारण विचारले, तेव्हा श्रेयसने सांगितले की तो लग्न करत आहे. नागेशने हे ऐकताच त्याला लग्न न करण्यास सांगितले. पण श्रेयसनेही त्याला साफ नकार दिला.

श्रेयस म्हणाला होता, "मी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा आहे. त्यावेळी माझ्या लग्नाच्या पत्रिकादेखील वाटल्या गेल्या होत्या. पण नागेशने मला लग्न रद्द करण्यास सांगितले. मला तेव्हा कळालेच नाही की मी काय करावे.

मी त्याला सुट्टीसाठी खूप विनवण्या केल्या. त्यानंतर मी नागेशकडे एक दिवसाचीच सुट्टी मागितली आणि लग्न कोणालाही न सांगता गुपचूप करेन असे सांगितले तेव्हा नागेशने मला सुट्टी दिली. आणि कोणाला काहीही न कळवता आम्ही लग्न केले"

नागेशने श्रेयसला लग्न न करण्यास सांगण्यामागचे कारण श्रेयसची 'इकबाल' या चित्रपटातील भूमिका हे होते. नागेशचे असे मत होते की, 'इकबाल' चित्रपटात श्रेयस 17-18 वर्षाच्या मुलाची भूमिका करत होता. त्यामुळे त्याने रिअल लाइफमध्ये लग्न केले, तर त्याच्या भूमिकेवर परिणाम होईल.

या चिपटाच्या प्रमोशनवेळी श्रेयसने त्याच्या लग्नाबद्दल कोणालाही सांगितले नव्हते. सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे या चित्रपटाच्या प्रिमियम शोला श्रेयसच्या बायकोने म्हणजेच दिप्तीने नागेशची बहीण म्हणून उपस्थिती लावली होती. त्यावेळी 'इकबाल' चित्रपटाचे निर्माते सुभाष घई यांना दिप्ती ही श्रेयसची बायको आहे हे माहीत देखील नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT