Shreyas-Deepti Wedding Anniversary Esakal
मनोरंजन

Shreyas-Deepti Wedding Anniversary: कॉलेज सेक्रेटरी ते घरवाली! अशी आहे श्रेयस तळपदेची लव्हस्टोरी...

सकाळ डिजिटल टीम

Shreyas-Deepti Wedding Anniversary: हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यामध्ये श्रेयस तळपदेच्या नावाचा सामावेश आहे. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी विनोदी भूमिका केल्या आहेत. त्याने आपल्या कॉमेडीने चाहत्यांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. लोकांना त्याचा कॉमिक टायमिंग खूप आवडतो. आज श्रेयसच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यानिम्मीत्त तुम्हाला त्यांची लव्हस्टोरी सांगणार आहोत.

श्रेयस आणि दीप्तीची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. खरंतर त्याला कॉलेजच्या फेस्टिवलमध्ये बोलावलं होतं आणि तिथचं त्याच कॉलेजच्या सेक्रेटरीला पाहिल्यानंतर त्याच्या ह्रदयत प्रेमाची रिंग वाजली. मग काय आज तीच कॉलेज सेक्रेटरी श्रेयसची बायको आहे.

2000 सालची गोष्ट आहे जेव्हा श्रेयसला कॉलेज फेस्टमध्ये बोलावण्यात आलं होतं. दीप्ती याच कॉलेजच्या फेस्टिव्हलमध्ये सेक्रेटरी होती. श्रेयसने दीप्तीला पाहिले आणि ते दोघांना पहिल्या नजरेतच प्रेम झालं. श्रेयसने दिप्तीला चारचं दिवसांत प्रपोज केले होते.

मात्र दिप्ती पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार होती. त्यामुळे तिने नकार दिला पण दीप्तीचे अमेरिकेला जाणे रद्द झाले. पुन्हा बोलणे, भेटणे सुरू झाले. अडीच वर्षांनतर 31 डिसेंबर 2004 मध्ये दोघांनी लग्न केले. लग्नाच्या 14 वर्षानंतर, 4 मे 2018 रोजी, श्रेयस आणि दीप्ती सरोगसीच्या मदतीने मुलगी ‘आद्या’चे आई-वडील झाले.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : आता मंत्रालयात नाही तर शेतकऱ्याच्या बांधावर होणार शेतीची चर्चा; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सांगितला उत्पन्नाचा मंत्र!

Sunday Special Recipe: सुट्टीच्या दिवशी ट्राय करा घरगुती खास पुलाव, बनवायला अगदी सोपा

Pushkar Singh Dhami : वन्यजीव हल्ल्यांवर मुख्यमंत्र्यांचा अ‍ॅक्शन मोड; ३० मिनिटांपेक्षा उशीर झाला तर वनअधिकाऱ्यांवर कारवाई!

आजचे राशिभविष्य - 14 डिसेंबर 2025

Asia Cup Trophy Controversy : ‘ऑपरेशन’ आशिया करंडक

SCROLL FOR NEXT