Shreyas Talpade  Esakal
मनोरंजन

Shreyas Talpade: 'हा माझा दुसरा जन्म..'! हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयसनं पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याने तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Vaishali Patil

Shreyas Talpade: बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याने तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात त्याच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता श्रेयसची प्रकृती स्थिर आहे. आता त्याने त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं हे सांगितलं. त्याचे हृदय 10 मिनिटांसाठी धडधडणे थांबले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुन्हा जिवंत करण्यासाठी इलेक्ट्रिक शॉकचा वापर केल्याचा खुलासाही त्याने केला.

हृदयविकाराच्या झटक्यानंतर आता श्रेयस तळपदेने बॉम्बे टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत श्रेयसने सांगितले की, 'मी क्लिनिकली डेड झालो होतो. तो एक तीव्र हृदयविकाराचा झटका होता. डॉक्टरांनी सीपीआर, इलेक्ट्रिक शॉक देण्याचा प्रयत्न करुन मला पुन्हा जिवंत केले. हा एक वेक-अप कॉल असेल. हे माझं दुसरे आयुष्य आहे. “जान है तो जहाँ है”.

त्या दिवसाबद्दल सांगताना श्रेयस म्हणाला, 'शेवटच्या शॉटनंतर मला श्वास घेताना त्रास जाणवू लागला आणि माझा डावा हात दुखायला लागला. मी फक्त माझ्या व्हॅनिटी व्हॅनकडे जाऊ शकलो आणि माझे कपडे बदलू शकलो. आम्ही अ‍ॅक्शन सीक्वेन्स शूट करत असल्याने त्यामुळे मला त्रास होत असावा असं मला वाटलं पण परिस्थिती इतकी वाईट होईल याचा मी विचारही केला नव्हता.'

'त्यानंतर कारमध्ये बसून मला वाटले की मी थेट हॉस्पिटलमध्ये जावे, पण मी आधी घरी गेलो. माझी पत्नी दीप्तीने मला त्या अवस्थेत पाहिले आणि पुढच्या 10 मिनिटांत आम्ही हॉस्पिटलला निघालो. आम्ही जवळजवळ तिथे पोहोचलो. मी पण गेट पाहिलं. त्यानंतर माझा चेहरा सुन्न झाला होता. मी बेशुद्ध झालो होतो."

पुढे त्याने सांगितले की त्यावेळी त्याची पत्नी दीप्तीने खुप शहाणपण दाखवत गाडीतून बाहेर येत लोकांकडे मदत मागितली. लोक आले आणि त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी श्रेयसला सीपीआर दिला आणि त्याचे हृदय धडधडू लागल्याचे त्याने सांगतिले.

श्रेयसने लोकांना सावध करत आपल्या आरोग्याला हलक्यात न घेता पूर्ण काळजी घेण्याचे आवाहन केले. सध्या श्रेयस घरी परतला असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तो आता पुन्हा कामाला सुरुवात करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT