Shreyas Talpade share amazing experience of missed road while visiting Dagdusheth Ganapati pune  SAKAL
मनोरंजन

Shreyas Talpade: दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेताना रस्ता चुकला अन् पुढे, श्रेयस तळपदेचा भन्नाट अनुभव

दगडूशेठ मंदिरात दर्शनाला जाताना श्रेयस रस्ता चुकला, मग पुढे काय झालं?

Devendra Jadhav

Shreyas Talpade News: श्रेयस तळपदे हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. श्रेयसला आपण आजवर अनेक मालिका, सिनेमांमध्ये पाहिलंय. साऊथच्या पुष्पाला आवाज देऊन श्रेयसने भारतभर स्वतःची ओळख मिळवली.

श्रेयस बाप्पाचा भक्त आहे हे सर्वांना माहितच आहे. श्रेयस पुण्याच्या दगडूशेठ हलवाई मंदिरात दर्शनाला गेला होता. पण तिथे तो रस्ता चुकला. मग पुढे काय झालं हे श्रेयसने स्वतःच सांगितलंय.

(Shreyas Talpade share amazing experience of missed road while visiting Dagdusheth Ganapati pune)

श्रेयस दगडूशेठला जाताना रस्ता चुकला अन् पुढे...

श्रेयसने सोशल मिडीयावर पोलिस अधिकारी बाप्पू वाघमोडे यांच्यासोबतचा फोटो शेअर केलाय. हा फोटो शेअर करुन श्रेयस लिहीतो, "देव आपल्याला गूढ मार्गाने भेटतो, आज तो मला बापू वाघमोडेच्या रूपाने भेटला."

दगडू शेठ हलवाई गणपती बाप्पाकडे जाण्यासाठी आम्ही वाटेत हरवलो आणि बाप्पू वाघमोडे आमच्याजवळ आले आणि मार्ग समजावून सांगिlतला... पण तरीही आम्हाला रस्ता सापडत नव्हता हे समजताच त्यांनी आम्हाला पुन्हा मार्ग दाखवला. त्यामुळे आम्ही पंडालपर्यंत पोहोचलो आहोत याची खात्री करून घेऊन ते आम्हाला त्यांच्या बाईकवरून संपूर्ण मार्गापर्यंत सोडाला आले. धन्यवाद साहेब.

श्रेयस पुढे सांगतो, "प्रभु आपल्या अवतीभवती आहे.. याची जाणीव या घटनेने झाली…आपण त्याला ओळखले पाहिजे….तो आपल्याला भेटतो, आपल्याला मदत करतो, मार्गदर्शन करतो, आपल्याशी बोलतो…आपल्याला तोच आहे याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

प्रत्येकाशी अत्यंत आदराने वागा कारण देव कोणत्या रुपात तुम्हाला भेटेल कधीच कळत नाही. गणपती बाप्पा मोरया."

श्रेयसच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, श्रेयस आगामी वेलकम 3 सिनेमात दिसणार आहे. याशिवाय आगामी पोस्टर बॉईज 2 या मराठी सिनेमात श्रेयस झळकणार आहे.

याशिवाय बहुचर्चित पुष्पा 2 सिनेमाच्या हिंदी आवृत्तीसाठी श्रेयस अल्लू अर्जुनला आवाज देणार आहे. पुष्पा 2 पुढील वर्षी २०२४ ला भेटीला येतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT