shreyas talpade shared memory of all the best drama
shreyas talpade shared memory of all the best drama sakal
मनोरंजन

श्रेयस तळपदेने सांगितली खास आठवण.. 'ऑल द बेस्ट' आणि बाळासाहेब ठाकरे..

नीलेश अडसूळ

Shreyas talpde : नाटक, मालिका, चित्रपट यांसह केवळ मराठीच नाही तर हिंदीतही आपल्या अभिनयाची मोहर उमटवणारा अभिनेता श्रेयस तळपदे गेली काही दिवस बराच चर्चेत आहे. 'पुष्पा' या दाक्षिणात्य सिनेमासाठी त्याने केलेलं डबिंग आणि नंतर डबिंग वरून सुरु झालेला वाद या दोन्ही भूमिकांमध्ये श्रेयस विशेष चर्चेत होता. सध्या तो 'झी मराठी'वरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे. श्रेयसच्या या भूमिकेचे विशेष कौतुक होते. मालिका आणि चित्रपटाप्रमाणे एकेकाळी श्रेयसने नाटकाचाही मंच गाजवला आहे. अनेक प्रायोगिक व्यावसायिक नाटकात त्याचे भरीव योगदान आहे. त्यामुळे आज त्याने नाटकाची एक जुनी आठवण शेअर केली आहे. (shreyas talpade shared memory of all the best drama)

ऑगस्ट १९९३ मध्ये आलेली देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित ‘ऑल द बेस्ट’ ही एकांकिका जबरदस्त गाजली. विषय, सादरीकरण, कलाकार या सगळ्यामुळे पुढे त्याचे व्यावसायिक नाटक करायचे ठरले. ३१ डिसेंबर १९९३ या दिवशी ‘ऑल द बेस्ट’ या नाटकाचा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश झाला. पहिल्या संचातील कलाकारांसाठीही हे नाटक महत्त्वाचे ठरले. भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, संपदा जोगळेकर या कलाकारांसाठीही हे नाटक टर्निग पॉइंट ठरले. पुढे ते नाटक दुसऱ्या संचात बसवले गेले. या संचात श्रेयस तळपदे, सतीश राजवाडे,वसंत आंजर्लेकर आणि लतिका सावंत यांचा सहभाग होता. याच आठवणींना आज श्रेयस तळपदे याने उजाळा दिला आहे.

'ऑल द बेस्ट' ही एकांकिका गाजल्यांनंतर निर्माते मोहन वाघ (mohan wagh) यांनी या एकांकिकेचे दोन अंकी नाटक करण्याचे सुचवले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपैकी केवळ अंकुशला कायम ठेवून इतर तीन पात्रांमध्ये संजय नार्वेकर, भरत जाधव आणि संपदा जोगळेकर यांना घेतले. अत्यंत विक्रमी ठरलेल्या या नाटकाचे अनेक प्रयोग झाले. पुढे या नाटकाही कलाकारांचा संच बदलून दुसरे कलाकार आले. या दुसऱ्या फळीत श्रेयस होता. यावेळी एका प्रयोगाला मोहन वाघ यांनी बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांनी आमंत्रित केले होते. ती ही आठवण..

या नाटकाचा एक फोटो शेअर करत श्रेयस म्हणतो, '' आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण म्हणजे आदरणीय बाळासाहेब ठाकरे जेव्हा आमच्या 'ऑल द बेस्ट' या नाटकाला आले होते. यासोबतच तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी सर, आमचे निर्माते मोहनकाका वाघ, सतीश राजवाडे, वसंत आंजर्लेकर आणि लतिका सावंत अशा सर्वांनी हा क्षण अनुभवाला आहे. जेव्हा बाळासाहेबांनी स्वतः या प्रयोगाचे कौतुक केले होते.. काय रमणीय होता प्रयोग..'' असे कॅप्शन त्याने दिले आहे. (#Throwback to that honourable & unforgettable moment when Saaheb #BalasahebThackrey ji himself graced our play ‘All The Best’. With the then CM Manohar Joshi sir, our producer Mohankaka Wagh, Satish Rajwade, Vasant Anjarlekar & Latika Sawant. What a show that was & to receive appreciation from Saaheb himself was the final icing on the cake.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT