Shruti Haasan Alcohol Addiction esakal
मनोरंजन

Shruti Haasan Birthday: 'दारु सोडायला लागली आठ वर्ष'..., ड्रग्जबाबतही केलं मोठं विधान प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा!

साऊथचे प्रख्यात अभिनेते कमल हासन यांची लाडकी लेक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रृती हासननं एका मुलाखतीमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे.

युगंधर ताजणे

Shruti Haasan Alcohol Addiction : आज श्रृती हासनता वाढदिवस. साऊथचे प्रख्यात अभिनेते कमल हासन यांची लाडकी लेक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रृती हासननं एका मुलाखतीमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे. आपल्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखल्या गेलेल्या श्रृतीनं बॉलीवूडमध्ये कित्येक कलाकारांसोबत स्क्रिन शेयर केली आहे.

श्रृती ही सध्या तिच्या सालार पार्ट वन सीझफायरमुळे चर्चेत आली आहे. प्रशांत नील यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्यामध्ये प्रख्यात अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत आहे. तर पृथ्वीराजही यात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सालारची चर्चा आहे. या वर्षीचा सर्वाधिक लक्षवेधी चित्रपट म्हणून सालारकडे पाहिले जात आहे.

हॉलीवूडच्या धर्तीवरील अॅक्शन सीन्स अशी सालारची ओळख करुन दिली जात आहे. आता मेकर्सनं त्याचे जोरदार प्रमोशन देखील सुरु केले आहे. दिग्दर्शकानं सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत त्याच्या अॅडव्हान्स बुकींगविषयी माहिती दिली होती. ऑस्कर विजेते दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी सालारचे पहिले तिकीट खरेदी केले होते.

या सगळ्यात श्रृतीच्या एका मुलाखतीनं चाहत्यांचे, नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती म्हणते, मला दारुचे व्यसन होते. आणि ते व्यसन सोडविण्यासाठी आठ वर्षे लागली. तो माझ्या आयुष्यातला खूपच वेगळा काळ होता. आठ वर्षांपासून मी स्वताला खूपच कंट्रोलमध्ये ठेवत आहे. जर तुम्ही दारु पित नसाल तर तुम्ही पार्टीमध्ये फ्री राहूच शकत नाही. त्यावेळी स्वतावर ताबा ठेवणे खूपच अवघड होऊन जाते.

मी जे काही केले त्याचा मला पश्चाताप नाही. कोणतीही तक्रारही नाही. शांत राहणे हे माझ्यासाठी खूपच महत्वाचे आहे. जी गोष्ट मी प्रामाणिकपणे केली त्याविषयीचे जे भले बुरे परिणाम भोगण्याची माझी तयारी आहे. यावेळी ड्रग्ज बाबतही विधान केले आहे. ती म्हणते मला नेहमीच माझ्या जवळच्या मित्रांसमवेत ड्रिंक्स घ्यायला आवडायचे. मी कधीही ड्रग्ज घेतले नाहीत.

श्रृतीच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तिच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर शेयर केला आहे. त्यामध्ये ती एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. त्यात तिच्या लूक्सचे प्रेक्षकांकडून, चाहत्यांकडून कौतुक होताना दिसत आहे. याशिवाय ती प्रभाससोबत सालारमध्ये देखील दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : मुंबईत पावसाची संततधार सुरु, सखल भागांत पाणी साचले

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT