Shruti sinha walks out of a college fest when the teacher disapprove the way she was dressed SAKAL
मनोरंजन

Shruti Sinha: श्रुतीचे छोटे कपडे पाहून शिक्षकांनी टोकलं, तर संतापत अभिनेत्री निघाली कॉलेजबाहेर! वाचा सविस्तर

अभिनेत्री श्रृती सिन्हासोबत मुंबईतील कॉलेजमध्ये विचित्र प्रकार घडल्याचं उघडकीस आलंय

Devendra Jadhav

Shruti Sinha News: डिसेंबर महिन्यात कॉलेजमध्ये विविध फेस्टिव्हलचं आयोजन केलं जातं. या फेस्टिव्हलमध्ये विविध सेलिब्रिटींना बोलावलं जातं. मुंबईतील अशाच एका कॉलेजमध्ये एक विचित्र प्रकार उघडकीस आलाय.

मुंबईतील एका कॉलेजमध्ये अभिनेत्री श्रुती सिन्हा तिच्या आगामी शोचं प्रमोशन करायला गेली होती. तिथे श्रुतीला तिच्या कपड्यांमुळे अडवण्यात आलं. त्यामुळे संतापत अभिनेत्री कार्यक्रमातून निघून गेली. काय घडला नेमका प्रकार? जाणून घ्या.

शिक्षकांनी केली अभिनेत्रीची निवडणूक

विरल भयानीने दिलेल्या बातमीनुसार, नुकतीच श्रुती सिन्हा मुंबईतील रामनारायण रुईया कॉलेजमध्ये तिच्या नवीन शोच्या प्रमोशनसाठी फेस्टमध्ये गेली होती. कॉलेजच्या नियमानुसार, श्रुतीचा ड्रेस योग्य नसल्यामुळे तिला शिक्षकांनी अडवलं. त्यामुळे तिने फेस्टमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आणि तिथून परत आली.

कॉलेजने ठरवलेला ड्रेसकोड पण...

श्रुती सिन्हा जेव्हा कॉलेजमध्ये गेली तेव्हा शिक्षकांना तिचा पेहराव आवडला नाही. यावेळी 'गंगूबाई काठियावाडी' फेम अभिनेता शंतनू माहेश्वरी सुद्धा तिच्यासोबत कॉलेज फेस्टमध्ये सहभागी होता. हे दोघे त्यांच्या आगामी शोचं प्रमोशन करायला गेले होते. कॉलेजने फेस्टिव्हलसाठी एक ड्रेस कोड ठरवला होता. पण त्याबद्दल श्रुतीला अजिबात कल्पना देण्यात आली नव्हती. आणि जेव्हा तिची अडवणूक करण्यात आली तेव्हा तिने फेस्टिव्हलमध्ये न जाण्याचा निर्णय घेऊन तिथून ती बाहेर आली.

या सर्व प्रकाराबद्दल श्रुतीची प्रतिक्रिया काय?

या सर्व प्रकाराबद्दल श्रुती म्हणाली, "मी रुईया कॉलेजमध्ये फेस्टिव्हलला भाग होण्यासाठी गेली होती. तेव्हा तेथील शिक्षकांनी अत्यंत उद्धट वागणुक देत माझ्या माझ्या कपड्यांबद्दल आक्षेप घेतला. त्यांच्या दृष्टीकोनातून मी परिधान केलेले कपडे विचित्र असल्याने त्यांनी ते कव्हर करायला सांगितले. त्याच्या या वागण्यामुळे त्या कॉलेजमधून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला."

या प्रकाराबद्दल अनेकांनी श्रृतीच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nipah Virus Alert : सावधान! पश्चिम बंगालमध्ये आढळले ‘निपाह’ विषाणूचे रूग्ण; केंद्र सरकारकडून हालचालींना वेग

Pune News : सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचा एल्गार; बिनविरोध निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले!

Bhogi Horoscope : भोगीनंतर 'या' 5 राशींचे भाग्य बदलणार; अचानक मिळतील पैसे, रखडलेली कामे पूर्ण होणार अन् ऑफिसमधून मिळेल खुशखबर

PMC Abhay Yojana : पुणेकरांनो घाई करा! अभय योजनेचे शेवटचे ७२ तास शिल्लक; ७५ टक्के सवलत गमावू नका!

Vande Bharat Sleeper Train: प्रतीक्षा संपली! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ शनिवारपासून धावणार

SCROLL FOR NEXT