Shubh Mangal Zyada Saavdhan hindi movie Trailer released  
मनोरंजन

ShubhMangal Zyada Saavdhan : आयुषमान झाला 'गे' अन् उडवली धमाल!

वृत्तसंस्था

आयुषमान खुराना नेहमीच हटके चित्रपट करताना दिसतो. 2017 मध्ये आलेला त्याच्या 'शुभमंगल सावधान' या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. आता पुन्हा एकदा तो 'शुभमंगल ज्यादा सावधान' हा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आजा रिलीज झाला आणि चित्रपटाच्या विषयामुळेच हा ट्रेलर क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका आपल्या तगड्या अभिनयाने उठावदार करणाऱ्या आयुषमानने 'शुभमंगल ज्यादा सावधान' या चित्रपटात पुन्हा एकदा हटके भूमिका केली आहे. समलैंगिक संबंधांवर भाष्य करणारा या चित्रपटात आयुषमान खुराना आणि जीतू के हे दोघं 'गे' दाखवले आहेत. त्यांचं दोघांचं एकमेकांवर प्रेम असतं आणि लग्न करण्यासाठी ते आपापल्या कुटूंबियांची परवानगी घ्यायला जातात. पण घरच्यांना हे कदापी मान्य नसतं. या सर्व गोंधळात घडणारे प्रसंग, प्रेमासाठीचा संघर्ष आणि लग्नाचे प्रयत्न याची गोष्ट सांगणारा हा चित्रपट आहे. विनोदी संवाद आणि सर्वच कलाकारांचा दर्जेदार अभिनय व हटके कथानक यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धूम करेल.

आयुषमान, जीतूसह नीना गुप्ता, गजराज राव, मानुश्री चढ्ढा, सुनिता राजवर, मानवी गर्गू ही स्टारकास्ट चित्रपटात असेल. 21 फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज हाईल. या चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक हितेश केवल्य हे आहेत.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

Jungle Safari: वाघ-हत्तींच्या सफारीपलीकडे उत्तराखंडची नवी झेप; आता पर्यटकांना दाखवणार ‘हिमालयीन घोस्ट

डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' लालबागच्या राजाला अखेरचा निरोप; गर्दीच्या महासागरात शेवटचा दर्शनाचा क्षण

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT