shubhangi gokhale  file
मनोरंजन

'हा ट्रॅप आहे, यात अडकू नका'; शुभांगी गोखलेंची नेटकऱ्यांना विनंती

वाचा, नेमकं काय आहे प्रकरण?

स्वाती वेमूल

अभिनेत्री शुभांगी गोखले Shubhangi Gokhale यांचं फेसबुक अकाऊंट हॅक Facebook account hacked झालं असून त्यांच्या अकाऊंटवरून अनेकांना मेसेज पाठवले जात आहेत. हे मेसेज ओपन करू नका, अशी विनंती त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित केली आहे. त्याप्रमाणे त्यांनी याबद्दलची माहिती सायबर सेललाही दिली आहे. शुभांगी यांच्या नकळत सगळ्यांना मेसेजमध्ये एक लिंक पाठवली जातेय. फॉलोअर्सना, नेटकऱ्यांना सतर्क करण्यासाठी त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित सर्वकाही स्पष्ट केलं आहे.

शुभांगी गोखले यांची पोस्ट-

पुन्हा एकदा माझं अकाऊंट हॅक झालंय. माझ्या नकळत सगळ्यांना मेसेजमध्ये एक लिंक जातेय. कृपया ती लिंक ओपन करू नका. मी सायबर सेलशी बोलतेय, त्यांनी सगळ्यांसाठी हा मेसेज पाठवलाय. 'हा मेसेज गेले अनेक दिवस फेसबुक मेसेंजर वर फिरतोय. कृपया कुणी तुम्हाला ही लिंक पाठवली तर ओपन करू नका. ओपन केलीत तर तुमच्या प्रोफाईलवरून इतरांना मेसेज जातील. ही एक व्हायरस लिंक आहे. तुम्ही जर क्लिक केलं तर ही लिंक तुम्हाला फेक युट्युबसारख्या दिसणाऱ्या साईटवर घेऊन जाते. जिथे मेसेंजरसारखंच पेज दिसतं, तिथे लॉग इन केल्याशिवाय व्हिडिओ दिसणार नाही असं सांगितलं जातं. हा ट्रॅप आहे यात अडकू नका,' अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर लिहित फॉलोअर्सना सतर्क केलं आहे.

शुभांगी यांच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी त्यांनासुद्धा सांभाळून राहण्याचं आवाहन केलं आहे. 'अशा फसवेगिरीपासून तुम्हीसुद्धा सांभाळून राहा', असं एकाने म्हटलंय. तर काहींनी त्यांना आलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट कमेंट बॉक्समध्ये पोस्ट केला आहे. शुभांगी 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत भूमिका साकारत होत्या. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी ही मालिका सोडली. आता मालिकेत शकू मावशीची भूमिका अभिनेत्री किशोरी अंबीये साकारत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे OBC मधूनच Maratha आरक्षणावर ठाम का? स्वतंत्र आरक्षणाला विरोध का? टेक्निकल गोष्ट समजून घ्या...

Service Charge Scam : सेवा शुल्काच्या नावाखाली हॉटेलमध्ये लूट; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर; पाच ते २० टक्क्यांपर्यंत वसुली

Maratha Protest : मराठ्यांच्या वादळाने मुंबईत वाहतूक कोंडी, फ्री वेनंतर जेजे फ्लायओवरही बंद; कोस्टल रोडवर वाहनांच्या रांगा

Pitru Paksha 2025: यंदा 6 कि 7 सप्टेंबर यंदा पितृपक्ष कधी? एका क्लिकवर सर्व महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

Marathwada Dams: मोठ्या धरणांच्या साठ्यात दुपटीने वाढ; मराठवाड्यातील स्थिती, मानार, सीना कोळेगाव शंभर टक्के भरले

SCROLL FOR NEXT