Shweta Tiwari Shweta Tiwari Latest News esakal
मनोरंजन

Shweta Tiwari Birthday : ट्रॅव्हल एजन्सीत काम ते टीव्हीची राणी; असा आहे श्वेताचा प्रवास

श्वेता तिवारीने अगदी लहान वयातच काम करायला सुरुवात केली होती

सकाळ डिजिटल टीम

Shweta Tiwari Latest News श्वेता तिवारी हे एक असे नाव आहे ज्याला कोणत्याही ओळखीची गरज नाही. श्वेता तिवारी 43वा वाढदिवस साजरा करीत आहे. श्वेता आतापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. उत्तम कलाकार असण्यासोबतच ती एक सशक्त स्त्री देखील आहे. हे तिने अनेकदा सिद्ध केले आहे. व्यावसायिक जीवनातील संघर्षा व्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यातही बरेच चढ-उतार पाहिले आहे. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याबद्दल...

श्वेता तिवारीने अगदी लहान वयातच काम करायला सुरुवात केली होती. वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी ती ट्रॅव्हल एजन्सीत काम करायची. यासाठी तिला फक्त ५०० रुपये मानधन मिळायचे. तिचे स्वप्न अभिनेत्री बनण्याचे होते. ज्यासाठी तिने प्रयत्न केले आणि अखेरीस मेहनतीचे फळ मिळाले.

बरेच लोकांना माहिती नाही टीव्हीच्या दुनियेत नाव कमावण्यापूर्वी श्वेताने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे. याशिवाय तिने पंजाबी आणि नेपाळी चित्रपटांमध्येही नशीब अजमावले आहे. परंतु, तिला खरी ओळख छोट्या पडद्यावर मिळाली. एकता कपूरच्या कसौटी जिंदगी की या मालिकेने ती घराघरात प्रसिद्ध झाली.

मालिकांव्यतिरिक्त श्वेताने रिॲलिटी शोमध्येही यश मिळवले आहे. आपल्या शानदार खेळाच्या जोरावर श्वेताने बिग बॉस ४ जिंकले होते. शोदरम्यान अनेकदा डॉली बिंद्रासोबत झालेले भांडण सगळ्यांना माहिती आहे. सर्व अडचणी असूनही ती शेवटपर्यंत शोमध्ये राहिली आणि ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satyapal Malik Death Cause: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन; 'या' गंभीर आजाराने होते ग्रस्त, नेमकं काय घडलं?

Amit Shah Record: अमित शहांनी नोंदवला सर्वाधिक काळ गृहमंत्री पदावर राहण्याचा विक्रम!

Latest Maharashtra News Updates Live : वांगणी रेल्वे फाटक रस्त्याची दुरवस्था, खड्ड्यामुळे वाहन चालवणंही कठीण

Video : पाठीमागून गपचूप आला मिठी मारली अन् छातीवर...; रस्त्यावर महिलेसोबत अश्लील कृत्य, धक्कादायक घटनेचे फुटेज व्हायरल, पाहा व्हिडीओ

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत ढगफुटीमुळे पूर, मलब्याने घरे उद्ध्वस्त! अनेक लोक अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू...

SCROLL FOR NEXT