Shweta Tiwari, Palak Tiwari Instagram
मनोरंजन

Shweta Tiwari: इंटीमेट सीन दिल्यावर व्हॅनिटीत जाऊन खूप रडलेली श्वेता..आईचा बोल्डनेस पाहून पलकही म्हणालेली..

श्वेता तिवारीनं २०१९ साली 'हम तुम एंड देम' मधनं ओटीटीवर पदार्पण केलं होतं,यातील तिच्या इंटिमेट सीन्सची जोरदार चर्चा रंगली होती.

प्रणाली मोरे

Shweta Tiwari: अभिनेत्री श्वेता तिवारीला कुठल्याही स्पेशल ओळखीची गरज नाही. केवळ सौंदर्यावरच नाही दमदार अभिनयाच्या बळावर श्वेतानं नेहमीच आपल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. एकीकडे जिथे श्वेतानं अनेक मालिका,वेबसिरीजमधून एकापेक्षा एक परफॉर्मन्सेस दिल्यानं ती चर्चेत राहिली.. तिथे दुसरीकडे सोशल मीडियावर नेहमीच तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात.

तिला पाहून तिच्या वाढत्या वयाचा पत्ताच लागत नाही. श्वेतानं छोट्या पडद्यावर नेहमी एका संस्कारी सूनेच्या व्यक्तिरेखाच साकारल्या आहेत. पण 'हम तुम एंड देम' या वेब सीरिज मध्ये तिनं अनेक इंटिमेट सीन्स दिले होते ज्यामुळे तिच्यावर रडण्याची वेळ आली होती.

यातील तिच्या बोल्ड सीन्सवर तिची मुलगी पलक तिवारीची देखील प्रतिक्रिया चर्चेत राहिली होती.(Shweta Tiwari bold scene daughter palak tiwari reaction)

श्वेता तिवारीनं २०१९ साली 'हम तुम एंड देम' मधनं ओटीटीवर पदार्पण केलं होतं. या सीरिज मध्ये श्वेतानं अनेक बोल्ड सीन्स दिले होते,ज्याचा तिला नंतर खूप पश्चाताप झाला होता म्हणे. श्वेतानं स्वतः याविषयी इन्स्टाग्रामवर बोलून दाखवले होते.

श्वेतानं याविषयी बोलताना म्हटलं होतं की,'' मी आपले केस छोटे केले होते,इंटीमेट सीन्स दिले, मला वाटत होतं की माझ्यात हे सगळं करायची क्षमता नाही''.

श्वेता म्हणाली होती,''कितीतरी वेळा मी इतकी नर्व्हस झाले होते की स्वतःला व्हॅनिटी व्हॅनमध्ये बंद करुन घेतलं होतं आणि खूप रडले होते. मला तेव्हा अनेकदा एन्झायटी सारखं फील व्हायचं''.

श्वेता म्हणाली होती की,तिला वाटायचं अशी भूमिका स्विकारून तिनं मोठी चूक केली. प्रत्येक सीन शूट झाल्यावर ती नर्व्हस फील करायची. श्वेताचं म्हणणं होतं की इतकी बोल्ड भूमिका तिनं कधीच केली नव्हती.

अर्थात नंतर श्वेतानं सीरिज आपल्या करिअरसाठी खूप महत्त्वाची ठरली हे देखील मान्य केलं होतं. तसंच या सीरिज मुळे आपण स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यायला शिकलो..जे एक कलाकार म्हणूनच नाही तर स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील महत्त्वाचं आहे.

श्वेता म्हणाली होती की. तिला हा विचार करून देखील भीती वाटायची की काय होईल जेव्हा ही सीरिज माझं कुटुंब पाहिल. तिची मुलगी,तिची आई तिच्याविषयी काय विचार करतील?

अर्थात श्वेताचं हे टेन्शन उगाचचं होतं. कारण तिची आई आणि मुलगी पलकनं तिचं काम पाहून तिची खूप प्रशंसा केली होती. पलक म्हणाली होती,''वाह..आई..खूपच मस्त भूमिका साकारली आहेस तू''.

माहितीसाठी सांगतो की आता श्वेताची मुलगी पलक देखील ग्लॅमर जगतात खूपच सक्रिय आहे आणि खूप वाहवा देखील लूटताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT