palak tiwari 
मनोरंजन

श्वेता तिवारीची मुलगी १३ वर्षांनी भेटली वडिलांना; घटस्फोटानंतर दुरावली होती नाती

स्वाती वेमूल

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पलक ही श्वेता आणि तिचा पहिला पती राजा चौधरी यांची मुलगी आहे. घटस्फोटानंतर पलक आईसोबत राहू लागली आणि आता तब्बल १३ वर्षांनंतर ती तिच्या वडिलांना भेटली आहे. मुलीला भेटल्यानंतर भावूक झालेल्या राजाने सोशल मीडियावर तिच्यासोबतचा फोटो पोस्ट केला. "१३ वर्षांनंतर मी माझ्या मुलीला भेटलो. हा माझ्यासाठी खूप खास क्षण आहे. याआधी तिला पाहिलं तेव्हा ती खूप लहान होती. आता ती खूप मोठी झाली आहे", असं राजा म्हणाला. 

मुलीच्या भेटीविषयी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत राजा म्हणाला, "मी आणि पलक व्हॉट्स अॅपद्वारे एकमेकांच्या संपर्कात होतो. मी तिला रोज गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवायचो. पण आम्ही कधीच भेटलो नाही. मी माझ्या आई-वडिलांसोबत मेरठमध्ये राहतो. पण काही कामानिमित्त मी मुंबईला आलो होतो. मुंबईला आल्यावर मी पलकला फोन केला असता ती तिच्या चित्रपटासाठी तयारी करत असल्याचं समजलं. त्यातूनही तिने वेळ काढला आणि माझी भेट घेतली. जवळपास दीड तास आम्ही गप्पा मारत होतो. यावेळी आम्ही भूतकाळात घडलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल चकार शब्द काढला नाही. आमच्या दोघांच्याही आयुष्यातील हे नवीन पर्व आहे."

आयुष्यात मिळालेल्या या दुसऱ्या संधीबद्दल राजा चौधरीने आनंद व्यक्त केला. मुलीसोबतचं नातं पूर्वीसारखं ठीक करायची इच्छाने त्याने व्यक्त केली. यासाठी त्याने पूर्वाश्रमीची पत्नी श्वेता तिवारीचेही आभार मानले. राजा आणि श्वेता यांचा संसार सात वर्षे टिकला. त्यानंतर राजाला घटस्फोट देण्यासाठी श्वेताने सहा वर्षे संघर्ष केला. घटस्फोटानंतर श्वेताने अभिनेता अभिनव कोहलीशी लग्न केलं. मात्र त्याच्यासोबतही अनेक वादविवाद निर्माण झाले आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Accident: रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे बळी प्रवासी ठरले! मुंबई लोकलवरील अपघातात ३ जणांचा मृत्यू

Manchar Leopard : मंचर परिसरात तब्बल २० बिबट्यांचा वावर, पेठ येथे पोलट्रीवर बिबट्याची बैठक!

WPL 2025 Retention: मुंबई इंडियन्सने 5 खेळाडूंना केले रिटेन, बाकीच्या 4 संघाचं काय? बघा कोणाकडे लिलावासाठी किती पैसे राहिले शिल्लक

CSMT Protest: रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन; मुंबई लोकलची सेवा विस्कळीत, ट्रेन तब्बल १ तास उशीराने, संपूर्ण प्रकरण काय?

Latest Marathi Live Update News : राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध

SCROLL FOR NEXT