Shweta Tiwari Statement on Her Bra Size  Instagram
मनोरंजन

'माझ्या ब्रा ची साईज..'; श्वेता तिवारीचं वादग्रस्त वक्तव्य

मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांकडे २४ तासांत मागितला अहवाल

स्वाती वेमूल

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) तिच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे चर्चेत असते. मात्र यावेळी ती एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. "माझ्या ब्रा ची साईज देवच घेत आहेत", असं अजब वक्तव्य श्वेताने एका पत्रकार परिषदेत केलं. तिच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला असून मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी कठोर भूमिका घेतली आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य हे खपवून घेतलं जाणार नाही, असं गृहमंत्री म्हणाले. (Shweta Tiwari Statement on Her Bra Size)

"श्वेता तिवारी यांचं वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. भोपाळ पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची चौकशी करून २४ तासांत अहवाल देण्यास सांगण्यात आलं आहे. ही बाब खपवून घेतली जाणार नाही," असं गृहमंत्री म्हणाले. श्वेता तिवारी लवकरच एका वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच वेब सीरिजच्या प्रमोशननिमित्त ती भोपाळला गेली होती. श्वेता तिच्या टीमसोबत पत्रकार परिषदेत आली होती. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना श्वेता म्हणाली की, देव माझ्या ब्राचा आकार घेत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Shweta Tiwari News Updates)

श्वेता ज्या वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी भोपाळला पोहोचली होती, ती सीरिज फॅशनशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तिने हे विधान गमतीने केलं. तिच्या वक्तव्याचा हा क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांनी श्वेतावर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. श्वेताने असं वक्तव्य करून लोकांच्या भावना दुखावल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

PBKS vs DC Live: प्रियांश आर्यचा पहिल्याच चेंडूवर कल्ला... स्टार्कला हाणला Six! नोंदवला भारी विक्रम, अक्षर पटेल स्तब्ध... Video Viral

New Railway Route : रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार! कसारा-मनमाड नव्या रेल्वेमार्गिकेसाठी सर्वेक्षण

रासायनिक भेसळीवर राज्य सरकारचा दणका, दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द होणार

PBKS vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले, पण Prithvi Shaw ला नाही खेळवले; पंजाब किंग्सच्या ताफ्यातही बदल

SCROLL FOR NEXT