Shweta Tiwari, Palak Tiwari, Ibrahim Ali Khan Esakal
मनोरंजन

Palak Tiwari: सैफच्या मुलासोबत डेटिंगच्या बातमीनंतर श्वेतानं फोनवरच घेतली होती पलकची शाळा.. विचारला होता 'हा' प्रश्न

सलमानच्या 'किसी का भाई किसी जान' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी पलक तिवारी अनेकदा तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे.

प्रणाली मोरे

Palak Tiwari: अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सिनेमात पदार्पण करण्याआधी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांत तिच्याविषयी मीडियानं बातमी समोर आणली होती की पलक अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानला डेट करत आहे.

त्या दोघांना अनेकदा एकत्र क्लिक केलं गेलं. पहिल्यांदा पलक आणि इब्राहिम या दोघांना गेल्या जानेवारीत एकत्र पाहिलं होतं. त्यावेळी पापाराझीचा कॅमेरा पाहून पलकने आपला चेहरा लपवला होता.(Shweta Tiwari On Palak Tiwari Dating saif ali khan son ibrahim Ali Khan)

ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. जेव्हा तिची आई श्वेता तिवारीला याविषयी माहित पडलं तेव्हा तिची रिअॅक्शन कशी होती याविषयी आता पलकनं खुलासा केला आहे.

पलक तिवारीनं नुकतीच टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली आहे. त्यादरम्यान तिनं आपले करिअर आणि वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

पलक तिवारीनं इब्राहिमसोबतच्या लिंक अपच्या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं सांगितलं. तसंच,हे जेव्हा आपल्या आईला कळालं होतं तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती याचा देखील तिनं खुलासा केला आहे.

पलक तिवारी म्हणाली,''जेव्हा माझ्या आईनं या डेटिंग अफवांच्या बातम्या पाहिल्या तेव्हा तिनं मला लिंक पाठवली आणि मला विचारलं की, 'हा कोण आहे आणि कधीपासून आहे तुझ्या आयुष्यात?'

यावर पलक तिवारी आपल्या आईला म्हणाली,''अगं..कुणी नाही...कारण खरंच काही नाहीय आमच्यात''. पलक तिवारीनं हे देखील सांगितलं की तिची आई श्वेता तिला कधीच क्रॉस क्वेशन्स करताना प्रश्नांच्या फैरी झाडत नाही.

माहितीसाठी इथं नमूद करतो की, पलक सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT