siddhant deepika 
मनोरंजन

दीपिकासोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी सिद्धांत चतुर्वेदी उत्सुक, म्हणाला तिच्यासोबत बोलायला मिळणंही प्रत्येक मुलाचं असतं स्वप्न..

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- 'गली बॉय' सिनेमात एमसी शेरची भूमिका साकारुन अनेकांच्या मनात आपली छबी निर्माण केलेला अभिनेता म्हणजे सिद्धांत चतुर्वेदी.  'गली बॉय' सिनेमात रणवीर सिंहसोबत काम केल्यानंतर त्याच्या अभिनयाचं सर्वस्तरांकडून कौतुक झालंय. 'गली बॉय'नंतर त्याला अनेक सिनेमांची ऑफर करण्यात आली. 'बंटी ऑर बबली' या सिनेमासोबत त्याच्याकडे अनेक सिनेमे आहेत. शकुन बत्रा यांच्या आगामी सिनेमात त्याला दीपिका पदूकोणसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली आहे. सिद्धांतच्या करिअरने आता चांगलीच भरारी घेतली आहे. 

सिद्धांतला त्याच्या आगामी सिनेमांच्या शेड्युलविषयी विचारल्यानंतर त्याने सांगितलं की, 'मी बंटी ऑर बबली २ प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी खूप उत्सुक आहे. तसंच प्रेक्षक हा सिनेमा कधी पाहतील आणि त्यांना हा कसा वाटेल याचीही मला उत्सुकता आहे. मला असं वाटतं की कोरोनाच्या या महारोगराईनंतर या सिनेमासोबत सगळं काही व्यवस्थित होईल. हा सिनेमा एक कौटुंबिक सिनेमा आहे.' 

सिद्धांत खूप खुश आहे की या सिनेमात राणी मुखर्जी, सैफ अली खान, पंकज त्रिपाठीसारख्या कलाकारांसोबत त्याला काम करण्याची संधी मिळाली आहे. सिद्धांतने सांगितलं की, 'हा एक सुंदर सिनेमा आहे.मला या सिनेमाचं शूटींग करताना खूप मजा आली आणि सध्यासारख्या कठीण काळानंतर लोकांना खूपंच हलक्या आणि मजेदार क्षणांची गरज आहे. मी खरोखरंच या सिनेमासाठी उत्साही आहे. यासोबतंच सिद्धांत शकुन बत्रा यांच्या आगामी सिनेमात दीपिका पदूकोण आणि अनन्या पांडेसोबत काम करण्यासाठीही उत्सुक आहे.'

याविषयी सांगताना सिद्धांत म्हणाला, 'मी उत्साही आहे कारण ही एक अशी शैली आहे जिचा हिंदी सिनेमामध्ये अजुनही प्रयोग केला गेला नाहीये. या सिनेमावर अतिशय बारकाईने काम केलं गेलं आहे आणि यात खूप माहिती देखील आहे. शकुन एक उत्तम दिग्दर्शक आहे. हा सिनेमा समकालीन आणि आत्ताच्या काळाला अनुरुप असा आहे. खूप मजा येणार आहे. मला दीपिका पदूकोणसोबत अभिनय करायचा आहे. दीपिकासोबत बोलायला मिळणं हे प्रत्यक मुलाचं स्वप्न आहे. हा रोमँटिक थ्रीलर सिनेमा आहे.मी माझा आनंद आवरु शकत नाहीये. हा सिनेमा मजेशीर आणि उत्तम कलाकारांचा आहे.'  

siddhant chaturvedi is exited to work with deepika padukone  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Video: शिवरायांनी अफजल खानाचा वध कसा केला? महाराजांचे भक्त असाल तर फक्त 7 मिनिटे वेळ काढा, थरारक AI व्हिडिओ व्हायरल

Pune Crime News : “मुळशीत पाय ठेवलास तर ‘मुळशी पॅटर्न’ करेन”; व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : पुण्यातील वारजे परिसरात विचित्र अपघात

तू भाई अपना काम कर...! Steve Smith सोबत 'राड्या'चा किस्सा रोहित शर्माने मजेशीर अंदाजात सांगितला; ०.४९ सेकंदाचा भन्नाट Video

Credit Card : ₹3,000 पर्यंत कॅशबॅक; झिरो जॉइनिंग फी; UPI पेमेंट्सवरही फायदा! जाणून घ्या या नव्या क्रेडिट कार्डच्या खास ऑफर्स

SCROLL FOR NEXT