siddhant Kapoor drug Case: Shatrughan Sinha’s son Luv Sinha calls out authorities for ‘selectively highlighting arrest of an individual’  Google
मनोरंजन

'सिद्धांत कपूरला अटक करण्याऐवजी जर...' लव सिन्हाचा तपास अधिकाऱ्यांना सल्ला

लव सिन्हानं सिद्धांत कपूर ड्रग्ज केस प्रकरणात तपास अधिकाऱ्यांना ट्वीट करुन तपासाची दिशा बदला असं सूचित केल्याचं दिसत आहे.

प्रणाली मोरे

शक्ती कपूर(Shakti kapoor) यांचा मुलगा सिद्धांत कपूरला (Siddhant Kapoor) पोलिसांनी बंगळुरुमध्ये रेव्ह पार्टीवर(Rave party) टाकलेल्या छाप्यात अटक केली आहे. त्यानं ड्र्ग्ज सेवन केल्याचं देखील स्पष्ट झालं आहे. त्या रेव्ह पार्टीत ड्रग्ज सेवन(Drugs case) केलेल्या एकूण सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी याविषयी दुजोरा दिला आहे. सिद्धांत कपूरला उल्सूर पोलिस स्टेशनला पुढील चौकशीसाठी नेण्यात आले आहे. (Shatrughan Sinha’s son Luv Sinha calls out authorities for ‘selectively highlighting arrest of an individual’)

Luv Sinha Tweet

शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हा(Luv Sinha) यानं सिद्धांत कपूरच्या ड्रग्ज केस प्रकरणावर एक ट्वीट केलंय जे सध्या चर्चेत आहे. तो म्हणाला, ''मला सिद्धांतनं ड्रग्ज सेवन केल्याविषयी काहीच बोलायचं नाही. पण मला आपल्या तपास अधिकाऱ्यांना इतकंच विचारायचं आहे की,जर आपले अधिकार इतके सक्षम आहेत,कुशल आहेत तर त्यांनी उच्च वर्गात,तरुण वर्गात, समाजातील सर्वच स्तरावर ड्रग्ज सेवन करण्याचं प्रमाणं झपाट्यानं का वाढतंय याकडे लक्ष देऊन त्याच्या मूळ प्रश्नाचं उत्तर शोधांव. प्रॉब्लेमच्या मुळाशी जावं. आणि आम्ही निश्चितच याबाबतीत त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो की ते याचं उत्तर लवकरात लवकर शोधतील''. लव ने एकूण या संदर्भात तीन ट्वीट केले आहेत.

Luv Sinha Tweet

लव सिन्हाने पुढील ट्वीटमध्ये लिहिले आहे,''कोणत्याही माणसाला अटक केल्यानंतर त्याच्या त्या गोष्टीला प्रमाणापेक्षा अधिक हायलाइट करणं हेच दर्शवतं की यात काम करण्यापेक्षा अधिक ते केल्यानंतर मोठेपणा मिरवणं हा उदद्देश होता. मी ड्रग्ज सेवन करण्या विरोधात आहे. पण जोपर्यंत या प्रश्नाला योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत गोष्टी स्पष्ट होणार नाही,केवळ वरवरचं चित्र दिसेल आणि यात काहीच सुधारणा देखील होणार नाही''.

Luv Sinha Tweet

आपल्या तिसऱ्या ट्वीटमध्ये थेट लव सिन्हानं लिहिलं आहे की, ''ड्रग्ज निर्मिती करणाऱ्या उत्पादकांना अटक करा,ते ड्रग्ज समाजात चुकीच्या पद्धतीनं जनमानसात पोहोचवणाऱ्या डीलर्सना अटक करा, यांनाच जर नेस्तनाबूत केलं तर लोक त्याचं सेवन करतीलच कसे. ड्रग्ज सेवन करणाऱ्यांना अटक करुन काहीच होणार नाही. याबरोबरच सिद्धांत या प्रकरणात समजुतदारपणा दाखवेल तसंच कमजोर पडणार नाही,संकटाचा सामना करेल'' असंही लव सिन्हा म्हणाला.

३७ वर्षीय सिद्धांत कपूरला रविवारी उशीरा बंगळुरात एका रेव्ह पार्टीत पोलिसांनी छापा टाकल्यानंतर अटक करण्यात आली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की सिद्धांतनं ड्रग्ज घेतल्याचं तपासात समोर आलं आहे. पण सिद्धांतचे वडील शक्ती कपूर यांचे म्हणणे आहे की तो पार्टीत डीजे म्हणून कामासाठी गेला होता. त्यामुळे ड्रग्ज घेताना त्याला पकडलं जाणं यावर माझा विश्वास नाही,ही गोष्ट शक्यच नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT