Siddhant Kapoor tests positive for drugs at a rave party in Bengaluru Google
मनोरंजन

ड्रग्ज सेवन प्रकरणात सिद्धांत कपूर जेरबंद; आता वडील शक्ती कपूर म्हणतायत...

बंगळुरू मध्ये पोलिसांनी सापळा रचून या बड्या पार्टीवर छापा टाकल्यानंतर तेथे सिद्धांत कपूर देखील होता.

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेते शक्ती कपूर(Shakti kapoor) यांचा मुलगा सिद्धांत कपूर याचं नाव ड्रग्ज Controversy मध्ये समोर येत आहे. बंगळुरू मध्ये एका पार्टीवर छापा टाकला असताना ही गोष्ट समोर आली आहे.सिद्धांत त्या पार्टीत उपस्थित होता आणि त्याची टेस्ट केली असताना त्यानं ड्र्ग्ज घेतल्याचं निदर्शनास आलं आहे. पोलिसांना या पार्टीविषयी माहिती मिळाली होती,त्यामुळे त्यांनी सापळा रचून या बड्या पार्टीवर छापा टाकल्यानंतर तेथे सिद्धांत कपूर देखील होता. त्यातील काही संशयितांना रक्त तपासणीसाठी पाठवलं गेलं. ज्यामध्ये अमली पदार्थांचं सेवन काही जणांनी केल्याचं समोर आलं. ज्यामध्ये सिद्धांत कपूर देखील आहे.(Siddhant Kapoor tests positive for drugs at a rave party in Bengaluru)

बंगळुरू मधील या पार्टीत ड्रग्ज सेवन केल्या प्रकरणी सहा जणांना संशयीत म्हणून ताब्यात घेण्यात आलं होतं. यामध्ये सिद्धांत कपूर देखील होता. माध्यमांनी यासंदर्भात शक्ती कपूर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते कोणाची फोन आधी स्विकारत नसल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क झाला असताना त्यांनी' सिद्धांत असं करुच शकत नाही' अशी प्रतिक्रिया दिली आहे. सिद्धांत बंगळुरात कुठल्या हॉटलला थांबला आहे हे देखील कपूर कुंटुबाला माहित नव्हते. किंवा सिद्धांत कुठल्या पार्टीला जाणार याची देखील कल्पना शक्ती कपूर यांना नव्हती.

सिद्धांत कपूर यानं बॉलीवूडमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेलं आहे. भागम भाग,चूप चूप के ,भूलभूलैय्या या सिनेमांसाठी त्यानं सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका पार पाडली होती. तसंच, जजबा,हसिना पारकर आणि चेहरे या सिनेमात त्यानं अभिनयही साकारला आहे.

काही दिवसांपूर्वी शाहरुखचा मुलगा आर्यन खानला एनसीबीनं ड्रग्ज केस प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. आर्यन खानला क्रुझ ड्रग्ज केस प्रकरणात गेल्या वर्षात अटकही करण्यात आली होती. जवळ-जवळ महिनाभर यासाठी आर्यनला तुरुंगवास भोगावा लागला होता. काही दिवसांपूर्वी एनसीबीनं या प्रकरणात चार्जशीट दाखल केली आहे,ज्यातून आरोपींच्या यादीतून आर्यन खानचं नाव पुराव्यां अभावी वगळण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT