Siddharth Chandekar And Mitali Mayekar Bought New Luxirious Car Esakal
मनोरंजन

Siddharth-Mitali: "माझी लक्ष्मी आली!" पाडव्याला सिद्धार्थ - मितालीनं दिली गोड बातमी! होतोय कौतुकाचा वर्षाव

Vaishali Patil

Siddharth Chandekar And Mitali Mayekar Bought New Car: मराठी मनोरंजन विश्वातील तितकीच लोकप्रिय जोडी म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. सिद्धार्थ अन् मितालीने मालिका आणि चित्रपटांमधुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दोघांच्या चाहत्यांची संख्याही काही कमी नाही.

दोघांची लव्ह स्टोरी चाहत्यांना प्रेमात टाकते. आता सिद्धार्थ आणि मितालीच्या घरी नवीन पाहूणा आला आहे. सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत त्यांनी ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेयर केली आहे.

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सिद्धार्थ-मितालीने त्यांची पहिली आलिशान कार आपल्या घरी आणली आहे. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सिद्धार्थने आपल्या लाडक्या बायकोचं कौतुक करत या कारचा फोटो शेयर केला आहे.

सिद्धार्थ-मितालीने Kia Seltos ही आलिशान कार खरेदी केली आहे. रिपोर्टनुसार या गाडीची किंमत 10.90 लाख पासून सुरू होते आणि टॉप मॉडेलची किंमत रु. 20.30 लाख आहे. सिद्धार्थ-मितालीनं काळ्या रंगाची गाडी खरेदी केली आहे.

या गाडीचे फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आमची पहिली गाडी…Proud of you बायको! तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!' तर मितालीने या गाडीचा एक व्हिडिओ शेयर केला आहे ज्यात तिने 'माझी लक्ष्मी आली' असं म्हटलं आहे.

आता सिद्धार्थ-मितालीचे हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे सिद्धार्थ-मितालीने गेल्यावर्षी दिवाळीत मुंबईत पहिलं घर खरेदी केले. आता त्यांनी नवी कार घरी आणली.

सिद्धार्थ-मितालीची जोडी सोशल मिडियावर खुप सक्रिय असते. दोघेही त्यांचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेयर करत असतात. या जोडीचा मोठा चाहता वर्ग असल्याने त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल देखील होत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT