siddharth chandekar mother seema married second time marathi celebrity news SAKAL
मनोरंजन

Siddharth Chandekar: "आता मी तुझं लग्न लावतोय", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने केलं दुसरं लग्न, अभिनेत्याचा आईला पाठिंबा

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या आईने दुसरं लग्न केलंय

Devendra Jadhav

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या आईने दुसरं लग्न केलंय. सिद्धार्थ चांदेकरची आई सीमा चांदेकर यांनी दुसरं लग्न केलंय.

सिद्धार्थची आई आणि अभिनेत्री सीमा चांदेकर यांनी दुसरं लग्न केलंय. सिद्धार्थने स्वतः पुढाकार घेऊन आईचं दुसरं लग्न लावलंय. सिद्धार्थने आईसाठी घेतलेल्या या निर्णयाचं खुप कौतुक होतंय.

(siddharth chandekar mother seema married second time marathi celebrity news)

सिद्धार्थची आईसाठी खास पोस्ट

आईच्या दुसऱ्या लग्नाचा फोटो पोस्ट करत सिद्धार्थने लिहीलंय की, "Happy Second Innings आई! तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं? तू आत्ता पर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं! I love you आई! Happy Married Life" अशी पोस्ट करत सिद्धार्थने आईला लग्नाच्या शुभेच्छा दिल्यात

कलाकारांनी केलं सिद्धार्थच्या आईचं अभिनंदन

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर म्हणते, हे खुप सुंदर आहे. खुप खुप शुभेच्छा

एका नेटकऱ्याने कमेंट केलीय की, अभिनंदन.. प्रत्येकाला मनासारखा जगण्याचा अधिकार आहे खूप छान

अभिनेता अभिजीत खांडकेकर म्हणतो... हे खुप छान आहे, खुप शुभेच्छा काकू

अभिनेत्री स्पृहा जोशीने कमेंट केलीय.. "Sidhdhuuuu काकू जगातला सर्व आनंद घेण्यास पात्र आहेत. अभिनंदन सीमा काकू

एकुणच सिद्धार्थने आईसाठी घेतलेल्या या निर्णयाचं सगळीकडे कौतुक होतंय. कोणत्याही वयात हवा तो जोडीदार मिळवण्याचा हक्क प्रत्येकाला असतो. सिद्धार्थच्या आईने घेतलेल्या निर्णयामुळे त्यांचं खुप कौतुक होतंय.

सिद्धार्थ लवकरच झिम्मा 2 या सिनेमात दिसणार आहे. सिद्धार्थ आणि अभिनेत्री मितालीच्या लग्नाला सुद्धा ३ वर्ष झाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT