siddharth chandekar and mitali mayekar 
मनोरंजन

'मितालीसोबत दोन वर्षे लिव्ह इनमध्ये होतो पण.. '; सिद्धार्थने व्यक्त केल्या लग्नापूर्वीच्या भावना

स्वाती वेमूल

मराठी चित्रपटसृष्टीचा 'चॉकलेट बॉय' म्हणून अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची ओळख आहे. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव आणि कोणत्याही व्यक्तीशी कधीही वाद न घालणारा अभिनेता म्हणून त्याचं कौतुक केलं जातं. सिद्धार्थने अभिनेत्री मिताली मयेकरशी नुकतीच लग्नगाठ बांधली. लग्नापूर्वी दोन वर्षे हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पण लग्न करणार म्हटल्यावर धडधड वाढतेय, अशा शब्दांत सिद्धार्थने त्याच्या भावना व्यक्त केल्या. अभिनेत्री सुरेखा तळवलकर यांच्या 'दिल के करीब' या चॅट शोमध्ये त्याने हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्याने त्याच्या खासगी आयुष्याविषयी बऱ्याच गोष्टी मनमोकळेपणाने सांगितल्या. 

लग्नाची तारीख जवळ आल्यावर मनात काय भावना आहेत असा प्रश्न सिद्धार्थला विचारला असता तो म्हणाला, "आता बॅचलर लाइफ संपली. आता एक व्यक्ती आयुष्याचा भाग म्हणून सदैव सोबत राहणार आहे. तसं आम्ही दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतच होतो. खरंतर लग्नानंतरही फार काही बदलणार नाहीये. फार फार तर घराचे पडदे बदलतील. पण मनातील भावना सगळ्या गोष्टी बदलून टाकतात. लग्नानंतर जबाबदारी वाढते, नाती जुळतात, दोन कुटुंब एकत्र येतात, असे शब्द कानी पडले की अजून धडधड वाढते."

२०१८ मध्ये 'व्हॅलेंटाइन डे'ला सिद्धार्थने मितालीला प्रपोज केलं होतं. तेव्हापासून हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यानंतर २०१९ मध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत सिद्धार्थ- मितालीचा साखरपुडा पार पडला. करोना महामारी आणि लॉकडाउनमुळे त्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली होती. २४ जानेवारी २०२१ रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT