Siddharth Mitali
Siddharth Mitali 
मनोरंजन

"ती आहे ना"; सिद्धार्थने सांगितला मितालीसोबतचा भावनिक क्षण

स्वाती वेमूल

लग्नानंतर संसारात असे अनेक प्रसंग येतात, जेव्हा पती-पत्नीला एकमेकांना खूप समजावून आणि सांभाळून घ्यावं लागतं. कोणत्याही समस्येला सामोरं जाताना जोडीदाराकडून मिळालेली खंबीर साथ सर्वांत महत्त्वाची ठरते. असाच काहीसा अनुभव अभिनेता सिद्धार्थ चांदेकर Siddharth Chandekar आणि त्याची पत्नी मिताली मयेकरला Mitali Mayekar आला. सिद्धार्थने घडलेला प्रसंग नेमका काय होता, हे इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट लिहित सांगितलं. (siddharth chandekar shared emotional experience with wife mitali mayekar read his post)

सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट-

"काय झालं? मला नीट सांगणारेस का?" मी तिला विचारलं. "मला खूप अपेक्षा होती या प्रोजेक्टकडून, आयत्या वेळेला हातून गेलं. खूप गोष्टी प्लॅन केल्या होत्या मी." ती हुंदके देत म्हणाली. काही वेळ काहीच न बोलता मी तिचे श्वास ऐकत बसलो. "मरूदे, ठेवते चल", असं म्हणून तिने फोन कट केला.

खूप नाराज झाली होती. हतबल झाली होती. मी ताबडतोब गाडीत बसलो आणि घराच्या दिशेनं निघालो. एवढं निराश व्हायला काय झालं असेल? मी आहे ना? मी असताना कसली काळजी करतेस? मी करेन ना सगळं व्यवस्थित. नवरा म्हणून मी काहीतरी केलंच पाहिजे. तिला हे सांगायला पाहिजे की मी असताना तुला कुठल्याही गोष्टीला घाबरायची गरज नाही. मी एक जबाबदार नवरा आहे हे मला त्या क्षणी जाणवायला लागलं.

मी दार उघडून आत गेलो. ती खिडकीत बसून ढगाळलेल्या आकाशाकडे पाहत बसली होती. तिच्यासमोर जाऊन बसलो. शांत आणि भाबडी नजर ठेवून आकाशाकडे पाहत बसलेल्या तिच्याकडे पाहत बसलो. तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं. ती निराश नव्हती. ती हतबल नव्हती. ती शांत होती. तिचा स्वत:शीच संवाद चालू होता. त्या क्षणाला तिला कशाचीच, कुणाचीच गरज नव्हती.

मी हलकेच तिच्या गुडघ्यांवर हात ठेवला. दचकून जागं झाल्यासारखं तिनं माझ्याकडे पाहिलं. माझा हात पकडून तिनं मला जवळ घेतलं. मी काहीतरी बोलायला जाणार तेवढ्यात तिनं आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यांनी माझा चेहरा पकडला आणि म्हणाली, "मी आहे ना? मी करेन सगळं नीट. नको काळजी करूस." काय बोलावं मला सुचेना. तिला घट्ट मिठीत घेण्यापलीकडे मला काहीही सुचलं नाही. गरजच नव्हती.

सिद्धार्थच्या या पोस्टवर 'आय लव्ह यू' अशी कमेंट मितालीने केली. एकमेकांना साथ देत कठीण परिस्थितीला सामोरं गेलो तर नातं अधिक घट्ट विणलं जातं, असं म्हणतात. या प्रसंगानंतर सिद्धार्थ-मितालीलाही हाच अनुभव आला असावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT