sidhharth chandekar and mitali mayekar  google
मनोरंजन

सिद्धार्थ-मितालीने दिली गुड न्यूज

या आनंदाच्या प्रसंगी सिद्धार्थ चांदेकर (siddharth chandekar) आणि मिताली मयेकर (mitali mayekar) या दोघांनाही सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गोड बातमी

नीलेश अडसूळ

मराठी मनोरंजन विश्वातील गाजलेली जोडी म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. त्यांचे प्रेम, लग्न आणि सोशल मीडियावर येणारे फोटो यामुळे या जोडीने मोठा चाहता वर्ग मिळवला आहे. गेल्या वर्षी ते लग्नबंधनात अडकले. पुण्यातील ढेपे वाड्यात अत्यंत दिमाखात हा लग्नसोहळा पार पडला. लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच त्यांनी एक गुड न्यूज दिली आहे. यासंदर्भात माहिती देणारा फोटो त्यांनी सोशल मीडिया वर शेअर केला आहे.

siddharth and mitali

आपलं नशीब अजमावून पाहण्यासाठी अनेकजण मुंबईत येतात. तिथे स्वतःचे जग निर्माण करण्यासाठी ते अतोनात मेहनत करत असतात. मुंबईत स्वतःचे घर व्हावे हि प्रत्येकाची इच्छा असते. ज्या दिवशी हा क्षण येथो त्यादिवशी आकाश मुठीत झाल्याचा आनंद मिळत असतो. हाच आनंद सध्या सिद्धार्थ आणि मिताली अनुभवत आहे. या दोघांनी मुंबईत स्वतःचे घर घेतले असून त्यासंदर्भात इंस्टाग्राम वर माहिती दिली आहे. हे त्यांचे पहिले घर असून आयुष्याची नवी सुरुवात होत असल्याची भावना सिद्धार्थ चांदेकरने फोटो सोबत व्यक्त केली आहे.

नुकताच या घराचा करार झाला असल्याचे त्यांच्या फोटोवरून दिसते. दोघांच्याही अंगठ्यांना शाई लागली असून त्यांचा आनंद गगनात न मावणारा आहे. हे घर कुठे आहे, कसे आहे या बाबत अद्याप माहिती मिळालेली नाही परंतु दोघेही लवकरच नव्या घरात प्रवेश करणार हे मात्र नक्की.

सिद्धार्थ चांदेकरचा 'झिम्मा' हा चित्रपट काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. लॉकडाउन नंतर आलेल्या या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर मोठी कमाई केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे याने केले होते. सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव या दिग्गज अभिनेत्री या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Election : ठाकरेंच्या अधिकृत उमेदवाराचा महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा, शिंदे गटात प्रवेश; प्रभागात विरोधक नावापुरते

Nagpur Crime: कर्जाच्या वादातून पतीने स्वतःला जाळले, गर्भवती पत्नी वाचवायला आली अन्, नागपूरमध्ये मन हेलावणारी घटना...

मोठी बातमी! इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची १५ एप्रिलपूर्वी अंतिम सत्र परीक्षा; पाचवी- आठवीच्या विद्यार्थ्यांची २६ एप्रिल आणि चौथी- सातवीची २६ एप्रिलला शिष्यवृत्ती परीक्षा

अग्रलेख - पुढचे पाऊल

जप कधी, कुठे, कसा? सगळे प्रश्न विसरा… ‘श्वासागणिक नामस्मरण’ हेच खरं साधन!

SCROLL FOR NEXT