siddharth jadhav  esakal
मनोरंजन

Siddharth Jadhav: सिद्धार्थ जाधवनं इंडिगो एअरलाईन्सवर व्यक्त केला संताप; नेमकं प्रकरण काय? पाहा व्हिडीओ

Siddharth Jadhav: नुकताच सिद्धार्थनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो इंडिगो एअरलाईन्सवर संताप व्यक्त करताना दिसत आहे.

priyanka kulkarni

Siddharth Jadhav: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतो. नुकताच सिद्धार्थनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो इंडिगो एअरलाईन्सवर संताप व्यक्त करताना दिसत आहे. सिद्धार्थनं मुंबई ते गोवा हा प्रवास इंडिगो एअरलाईमधून केला. प्रवास झाल्यानंतर सिद्धार्थनं त्याची बॅग घेतली, पण त्याची बॅग ही तुटली होती. या संपूर्ण प्रकरणाबद्दल सिद्धार्थनं व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं.

काय म्हणाला सिद्धार्थ?

सिद्धार्थनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सिद्धार्थ हा त्याची तुटलेली बॅग दाखवताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ म्हणतो, "नमस्कार मी सिद्धार्थ जाधव मी आता मुंबईवरुन गोव्याला इंडिगो फ्लाईटनं आलो आहे. त्यांनी किती छान पद्धतीनं माझं माझी बॅग मला दिली आहे, इंडिगोवाल्यांनी माझ्या सामानाची काळजी खूपच छान घेतली आहे, बघा तुम्हीच", सिद्धार्थनं या व्हिडीओला "थँक्स इंडिगो" असं कॅप्शन दिलं आहे.

अनेकांनी सिद्धार्थच्या या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "मॅनेजमेंटचा निव्वळ निष्काळजीपणा, याबद्दल तक्रार कर!"

पाहा व्हिडीओ

इंडिगोकडून सिद्धार्थला रिप्लाय

इंडिगोनं सिद्धार्थच्या व्हिडीओला रिप्लाय दिला आहे. त्यांनी सिद्धार्थच्या व्हिडीओला रिप्लाय दिला,"मिस्टर जाधव,तुमची बॅग खराब झाली, हे जाणून घेतल्यानंतर आम्हाला वाईट वाटलं. आम्ही या प्रकरणाची त्वरित दखल घेऊ इच्छितो. तुम्ही कृपया आम्हाला तुमचा फोन नंबर आणि तुमच्याशी बोलण्यासाठी आमच्यासाठी सोयीस्कर वेळ DM करू शकता का?"

सिद्धार्थ जाधवचा लग्न कल्लोळ हा सिनेमा काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख यांनी देखील काम केलं आहे. सिद्धार्थनं दे धक्का, धुराळा, हुप्पा हुय्या या चित्रपटात देखील काम केलं आहे. आता सिद्धार्थच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या मंत्रिमंडळात कोण इन, कोण आउट? संभाव्य यादी समोर; महाराष्ट्रातूनही 'हे' नाव चर्चेत, धर्मेंद्र प्रधानांचं खातं कुणाला?

Latest Marathi News Update : केरळमध्ये एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू; सात वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला

Humanity Story: आयुष्याच्या सायंकाळी कोसळल्या धर्माच्या भिंती! नात्यांनी साथ सोडली, मानवतेने दिला आधार, मुस्लिम महिलेने पार पाडले हिंदू अंत्यविधी..

IND vs IRE, IND W vs AUS W: आज क्रिकेट चाहत्यांची चांगलच गोंधळणार! टीम इंडियाचे एकाच दिवशी 2 सामने; कुठे आणि किती वाजता पाहणार?

Satej Patil on Gokul election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार? सतेज पाटील यांनी एका वाक्यात कंडका पाडला

SCROLL FOR NEXT