Siddharth Kiara Wedding video  Esakal
मनोरंजन

Siddharth Kiara Wedding video : कियारा रंगली सिडच्या प्रेमाच्या रंगात! मेंहदी सजली, जोडपी नाचली, आता हळदीची तयारी

सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी यांची जैसलमेर सूर्यगढ पॅलेसमध्ये रॉयल वेडिंग होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस आज आहे. दोघेही आज फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. सिद्धार्थ आणि कियारा सूर्यगड पॅलेसमध्ये हा भव्य लग्न समारंभ पार पडेल.

4 फेब्रुवारीपासून पाहुणे जैसलमेरला पोहचले. दुसरीकडे, 5 फेब्रुवारीला सिद्धार्थ आणि कियाराही आपापल्या कुटुंबासह सूर्यगढ पॅलेसमध्ये पोहोचले. सिद्धार्थ आणि कियारा यांच्या भव्य लग्नासाठी सूर्यगढ पॅलेस एखाद्या नवरीसारखा सजला आहे. गेल्या काही दिवसांपासून लग्नाची तयारी जोरात सुरू होती.

६ फेब्रुवारीला कियाराच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेहेंदीही सजली आहे. तर सिद्धार्थनेही त्याच्या हृदयाप्रमाणे हातावरही कियाराचं नावं मेहेंदीने लिहिलं आहे. यावेळी सर्वांनीच खूप मजा केल्याचं दिसतयं. फिल्म इंडस्ट्रीची आवडती मेहंदी कलाकार वीणा नागडा मेहंदी काढण्यासाठी जैसलमेरला पोहोचली होती. त्यामुळे दोघांच्या हातावर तिनेचं मेंहदी काढली आसावी.

कियारा आणि सिद्धार्थ यांचा काल म्हणजेच सोमवारी एक भव्य संगीत सोहळा पार पडला. यादरम्यान दोघांनी संगीता कार्यक्रमात खूप धमाल केली. संगीत दुल्हनिया कियाराच्या कुटुंबाने जबरदस्त परफॉर्मन्स दिला. रिपोर्ट्सनुसार, कियाराच्या कुटुंबाने 'गोरी नाल', 'रंगी सारी', 'रांझा', 'मन भरेया' आणि 'तेरा बन जाऊंगा' सारख्या अनेक हिट गाण्यांवर नृत्य केले. संगीत रात्रीत कियारा आणि सिद्धार्थची आवडती रोमँटिक गाणी देखील वाजवण्यात आली.

यावेळी सूर्यगढ पॅलेस गुलाबी रंगात सजवण्यात आला होता. त्याचवेळी मेहंदी लगाके रखना, साजन जी आणि पटियाला पेग ही गाणी वाजवली गेली.

आता थोड्याच वेळात या जोडप्याच्या हळदी समारंभाला सुरुवात होणार आहे. दोघांच्या हळदी समारंभाची पूर्ण तयारी झाल आहे. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो सूर्यगढ पॅलेसच असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये संपूर्ण परिसर पिवळ्या रंगाने सजलेला दिसतो. या जोडप्याच्या हळदी समारंभाला लवकरच सुरुवात होऊ शकते.

आज म्हणजेच ७ फेब्रुवारीला हे जोडपे सात फेरे घेणार असल्याची माहिती आहे. मात्र, हनिमूनला जाण्याचा या जोडप्याचा सध्या कोणताही प्लॅन नाही. लग्नानंतर कुटुंबीयांकडून विधी पूर्ण होतील. 12 फेब्रुवारीला मुंबईत सिद्धार्थ-कियाराचं वेडिंग रिसेप्शन होणार असल्याचं वृत्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT