Sidharth Malhotra Birthday his secret diet plan fitness funda sakal
मनोरंजन

Sidharth Malhotra Birthday: भाजीत भाजी.. तरुणींच्या लाडक्या सिद्धार्थचा हा आहे सीक्रेट डायट प्लान

सिद्धार्थ मल्होत्रा सारखं सुपर कुल दिसायचंय? मग हा घ्या त्याचा डायट प्लान...

सकाळ डिजिटल टीम

Sidharth Malhotra Birthday: बॉलिवूडचा हँडसम हीरो सिद्धार्थ मल्होत्राचा आज वाढदिवस.. आज तो आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आणि बघता बघता काहीच वर्षात त्याने 15 चित्रपट केले. त्याच्या सुपरकुल लुकमध्ये आणि फिटनेसमुळे तरुणी त्याच्यावर फिदा आहेतच. पण त्याच्या अभिनयाचे लाखों चाहतेही आहेत. आज त्याच्या वाढदिवसानिमित जाणून घेऊया त्याचं पण त्याच्या खास डायट प्लान...

(Sidharth Malhotra Birthday his secret diet plan fitness funda)

सिद्धार्थ मल्होत्राला घरगुती पद्धतीने बनवलेले पदार्थ आवडतात, तसेच इटालियन आणि जापनीज पद्धतीचे खाद्यपदार्थदेखील आवडतात. फिटनेसच्या बाबतीत सिद्धार्थ खूपच सजग आहे. तो ऑरगॅनिक पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करतो. सकाळी नाश्त्याला अंडी किंवा स्वीट पोटॅटो आणि ग्लुटेन-फ्री ब्रेड हा त्याचा मेन्यू असतो. दुपारच्या जेवणात चिकन ब्रेड, हिरव्या पालेभाज्या- त्यातही पालकाचा जास्त वापर असतो; तसेच काही वेळा उकडलेले बटाट्यांवरही साहेब खूश असतात.

ब्रोकोली त्याची आवडती भाजी आहे. रात्रीच्या जेवणात तो फक्त ग्रील्ड फिश खातो. दिवसातून तो फक्त तीन मिल्स घेतो. फळांऐवजी तो सुका मेवा खायला प्राधान्य देतो. त्याला बुलेट कॉफी आवडते- ज्यात ब्लॅक कॉफी आणि एक चमचा तूप असे कॉम्बिनेशन असते, तसेच मल्टिग्रेन भाकरी आणि त्यासोबत कोणतीही भाजी खायला त्याला आवडते. साखरेपेक्षा पदार्थांत गुळाचा वापर करणं योग्य असल्याचं त्याचं म्हणणं आहे. सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेलं अन्न आणि घरी शिजवलेलं अन्न ही आपल्या उत्तम आरोग्याची ‘रेसिपी’ असल्याचे तो सांगतो.

सिद्धार्थची आई उत्तम स्वयंपाक करते. तिच्या हातचे पदार्थ त्याला अधिक आवडतात. काळे चने, हलवा आणि पुरी त्याची आवडती डिश आहे. याशिवाय गोड पदार्थांचा तो विशेष चाहता आहे. जिलेबी, हॉट चॉकलेट फज, डार्क चॉकलेट त्याला खायला आवडते. सिद्धार्थला ‘गुलाबजाम आणि लोणचे’ असे आगळेवेगळे आणि काहीसे विचित्र कॉम्बिनेशन पसंत आहे. याशिवाय सुशी, बिर्याणी, चिकन ग्रेवी विथ रोटी हा मेन्यू तो कधीही खाऊ शकतो.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्ट्रगलिंग फेज असतो. सिद्धार्थही त्याला अपवाद नाही. ज्यावेळी सिद्धार्थ मुंबईत आला, त्यावेळी त्याच्या हातात फारसे चित्रपट नव्हते. तेव्हा तो स्वतःच स्वयंपाक बनवायचा. त्यात शक्यतो बॉइल्ड फूड आणि मोजकेच खाद्यपदार्थ त्याला करता यायचे. आता मात्र तो स्वयंपाकात चांगलाच पारंगत झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात त्याने बटर गार्लिक प्रॉन्स केले होते. त्याचा फोटोही त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता.

सिद्धार्थ हा दिल्लीतच लहानाचा मोठा झाला. त्याच्या मते, दिल्ली ही भारताची ‘फूड सिटी’ आहे. तेथील पुरी, चना, हलवा, पाणीपुरी, आलू टिक्की, चना चाट, राज कचोरी त्याची फेव्हरेट आहे. बंगालच्या स्वीटचाही तो चाहता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT