Sidharth Malhotra and Kiara advani Sakal
मनोरंजन

Sidharth Malhotra: कियाराने सिद्धार्थच्या वाढदिवसासाठी सरप्राईज केले प्लॅन; चित्रपटाच्या सेटवर...

काही काळापासून सिद्धार्थ आणि कियारा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी हे सध्या इंडस्ट्रीतील सर्वात आवडते कपल आहेत. काही काळापासून सिद्धार्थ आणि कियारा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे 'शेरशाह' कपल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानमध्ये लग्न करू शकते.

सध्या या जोडप्याने लग्नाची बातमी नाकारली आहे ना स्वीकारली आहे. लग्नाच्या बातम्यांदरम्यान, कियारा अडवाणीने सिद्धार्थच्या वाढदिवसानिमित्त तिच्या 'टू बी पती'साठी एक खास सरप्राईज प्लॅन केला आहे. सिद्धार्थच्या वाढदिवसानिमित्त कियाराने कोणता खास प्लान केला आहे ते जाणून घेऊया...

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आज 16 जानेवारीला सिद्धार्थचा वाढदिवस आहे आणि इंडस्ट्रीतील अनेक कलाकार त्याला शुभेच्छा देत आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर सिद्धार्थचा वाढदिवस खास बनवण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड आणि होणाऱ्या पत्नीने एक खास सरप्राईज प्लॅन केला आहे. हे सरप्राईज सिद्धार्थच्या सेटवर आयोजित करण्यात आले होते.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' चित्रपटाच्या सेटवर आहे आणि या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. सेटवरील एका आतल्या व्यक्तीने सांगितले की, सिद्धार्थला त्याच्या वाढदिवसानिमित्त कियाराकडून एक खास सरप्राईज मिळाले. कियाराने सिडसाठी वाढदिवसाचा सुंदर केक आणि फुले पाठवली होती, ज्यामुळे सिद्धार्थ खूप खूश झाला होता. लवकरच ते त्यांच्या लग्नाच्या बातमीला दुजोरा देतील अशी आशा चाहत्यांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...

Latest Marathi News Live Update : ३० जानेवारीपासून अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला; राळेगणसिद्धीत संत यादवबाबा मंदिरात सुरू होणार आंदोलन

अक्षय खन्ना की रणवीर सिंग! कोणाकडे जास्त संपत्ती? एकाकडे मोठी हवेली तर दुसऱ्याकडे तगडा बँक बॅलेन्स

Profitable Airline India : नफा मिळवणारी एकमेव विमान कंपनी कोणती?; 'इंडिगो संकट' काळात सरकारनी दिली संसदेत माहिती

MLA Shashikant Shinde: कृषी अवजारे, खते, बियाण्यावरील जीएसटी रद्द करा: आमदार शशिकांत शिंदे आक्रमक, कृषिमंत्री भरणे काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT