Kiara-Sidharth Wedding Video Esakal
मनोरंजन

Kiara-Sidharth Wedding Video: 'चुप माही चुप है रांझा, बोल कैसे वे ना जा!' शेरशाहच्या लग्नातला तो खास क्षण

कियाराची फिल्मी एन्ट्री तर सिद्धार्थचा किस, लग्नाचा प्रत्येक क्षण मनात भरणारा...पाहुन वाटेल हेवा!

सकाळ डिजिटल टीम

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी हे लव्ह बर्डस आता कायमचे एक झाले आहेत. त्यांनी ७ फेब्रुवारीला राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये सिड-कियारा जवळच्या नातेवाईकांच्य उपस्थित विवाह बंधनात अडकले. यानंतर दोघांनीही लग्नाचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यांना दोघांना पाहून चाहते खुप खुश झाले.आता आज सिड आणि कियाराने लग्नाची आणखी एक झलक चाहत्यांनसोबत शेअर केली आहे.

त्यानी एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो एखाद्या परीकथेपेक्षा कमी दिसत नाहीये. यात नववधू असलेल्या कियाराची एन्ट्री तिचा स्टेजवरचा भन्नाट डान्स, सिद्धार्थची तिनं केलेली छेडछाड, त्याला मारलेली मिठी, वरमाला समारंभ आणि मग शेवटचा लिप किस... सगळं काही मनाला भावणारा आहे.

त्यानी शेअर केलेल्या लग्नाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात राजेशाही थाटात नववधू कियाराची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. ती स्टेजवर येते आणि डान्सही करते. ती सिडला पाहचताच त्याला तिला मिठी मारते. यानंतर त्यांचा वरमाला समारंभ होतो, ज्यामध्ये सिद्धार्थही तिला त्रास देतांना दिसतो.

यानंतर सिद्धार्थने कियाराच्या गळ्यात मालाही घालताच गुलाबाच्या पाकळ्या चारही बाजूंनी उधळण होते. दोघेही एकमेकांना किस करतात आणि नंतर पाहुण्यांकडे पाहून आनंद व्यक्त करतात. शेवटी दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत हात जोडून बसलेले दिसतात आणि या सगळ्यात त्याच्या 'शेरशाह' चित्रपटातील 'रांझा' हे गाणेही या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर वाजतांना दिसतेय.

त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी खुप प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच त्याचा हेवा वाटेल असं शाही लग्न त्यांनी केल्याचं दिसतयं. हा व्हिडिओ म्हणजे चाहत्यांसाठी एखादी ट्रिट आहे आणि चाहत्यांना हा व्हिडिओ खुप आवडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg Tragedy : Video करून तरूणाने घेतला गळफास, पत्नी नातेवाईकांच्या हाती लागलेल्या व्हिडिओत धक्कादायक बाबी समोर

Madhya Pradesh : आता मध्य प्रदेशातील सर्व शासकीय भरतींसाठी एकसमान परीक्षा प्रणाली लागू होणार, CM यादव यांची घोषणा

Latest Marathi News Live Update : सुषमा अंधारे डॉक्टर निर्भया यांच्या गावात दाखल; टाकीवर गावकऱ्यांचे आंदोलन सुरू

अनैतिक संबंधात अडसर, पतीच्या हत्येनंतर ओढणी लपवून पत्नीने पोलिसांना केला कॉल, नकुल भोईर हत्या प्रकरणी मोठी अपडेट

VIDEO : स्विफ्ट कारने तीन वर्षांच्या चिमुरडीला चिरडले, पण नशिबाने...; CCTV मध्ये कैद झाला अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT